महाराष्ट्रात कोरोना साथीचा पहिला बळी : मुंबईतील रुग्णाचा उपचाराच्या वेळी मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. येथील कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा १७ मार्च या दिवशी सकाळी मृत्यू झाला.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३७ वर पोचली

भारतात कोरोनाचा फैलाव चालू असून आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३७ झाली आहे. कर्नाटकमध्ये या विषाणूंची लागण झालेले २ नवीन रुग्ण आढळले असून तेथील एकूण संख्या १० झाली आहे.

लोकल आणि बस सेवा तूर्तास बंद करणार नाही ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्यात कोरोनाचे १७ मार्चपर्यंत ४१ सकारात्मक (पॉझिटिव्ह) रुग्ण आहेत. एक रुग्ण वगळता अन्य रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. सध्या तरी लोकल आणि बस सेवा बंद करणार नाही; कारण सामान्य लोकांचे पोट त्यावर आहे.

‘कोरोना ही अल्लाने केलेली शिक्षा’ म्हणणार्‍या इराकमधील धर्मगुरूंनाच संसर्ग !

‘आता स्वतःला कोणत्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून कोरोनाचा संसर्ग झाला आहे’, हे इस्लामी धर्मगुरूंनी सांगावे ! ‘जगभर थैमान घालणार्‍या जिहादी आतंकवादाला इस्लामी धर्मगुरु खतपाणी घालतात. त्याचीच शिक्षा त्यांना मिळाली आहे’, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

(म्हणे) ‘अल्ला अप्रसन्न असल्याने कोरोना पसरत आहे !’ – देवबंदी उलेमांचा दावा

‘इराणमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोना पसरण्यामागेही हेच कारण आहे’, असे उलेमांना म्हणायचे आहे का ? हिंदूंच्या धर्मश्रद्धांना अंधश्रद्धा ठरवून हिंदु संतांवर तुटून पडणारे नास्तिकवादी, पुरो(अधो)गामी, तसेच हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे अशा वेळी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

इस्कॉन मंदिरात प्रवेश करतांना हात धुण्यासाठी गोमूत्र दिल्याच्या प्रकरणी एका व्यक्तीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

गोमूत्राने विषाणूंची वाढ होत नाही, याला वैज्ञानिक आधार आहे. ते संशोधनाने सिद्धही झाले आहे. असे असतांना याचा काडीमात्र अभ्यास न करता अशी तक्रार करणे अयोग्य आहे. यावरून हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येते !

दक्षिण कोरियामध्ये चर्चमधील ‘पवित्र पाणी’ प्यायल्याने ४६ जणांना कोरोनाची बाधा, चर्च बंद !

असा प्रकार एखाद्या मंदिरात घडला असता, तर एकजात पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी मंदिरातील पुजार्‍यांवर तुटून पडले असते आणि हिंदूंच्या धार्मिक परंपरांना ‘अंधश्रद्धा’ ठरवत यावर कारवाई करण्याची मागणी केली असती !

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी सर्वांनी शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, आध्यात्मिक इत्यादी स्तरांवर पूर्वसिद्धता करणे आवश्यक आहे. याविषयीचे सर्वसाधारण विवेचन पुढे केले आहे. या विवेचनानुसार जेवढे शक्य आहे, त्याच्या कार्यवाहीला आतापासूनच आरंभ करावा.

जे.एन्.यू.मधील ‘वि.दा. सावरकर मार्गा’च्या पाटीला अज्ञातांनी काळे फासून त्यावर ‘जिना रोड’ नाव लिहिले !

राजधानीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा असा अवमान केला जातो, हे सरकारी यंत्रणांसाठी लज्जास्पद ! भारतात अद्याप जिनांचे वंशज रहात असून त्यांना शोधून पाकिस्तानमध्ये पाठवणे आवश्यक आहे, हे या घटनेतून लक्षात येते !

इस्रायलमध्ये मणीपुरी तरुणाला ‘चिनी’ समजून ‘कोरोना कोरोना’ म्हणत मारहाण

जगाला कोरोनाची ‘देणगी’ देणार्‍या चीनविषयी जगभर लोकांच्या मनात किती रोष आहे, हेच यातून दिसून येते. तरीही या प्रकरणात ईशान्येकडील भारतियाला त्याच्या अंगकाठीवरून ‘चिनी’ समजून कुणी मारहाण करत असेल, तर भारत सरकारने त्याची नोंद घेऊन संबंधितांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !