केंद्र सरकारकडून कोरोना ही ‘राष्ट्रीय आपत्ती’ घोषित

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांनाच केंद्र सरकारने या संकटाला ‘राष्ट्रीय आपत्ती’ म्हणून घोषित केले आहे.
आपत्काळाची दाहकता संत-महंतांनी आधीच सांगितली आहे. हे लक्षात घेऊन त्यातून तरून जाण्यासाठी हिंदूंनी साधना करणे आवश्यक !

धर्मांतरावर नियंत्रण आणण्याची मागणी करणारी याचिका देहली उच्च न्यायालयाने फेटाळली

धर्माचे पालन करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक आवड असली, तरी काही आमिषे दाखवून किंवा बलपूर्वक धर्मांतर करण्यास कोणी बाध्य करत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अशी धर्मांतरे रोखण्यासाठी हिंदूंना न्यायालयाचा आधार वाटतो. आता न्यायालयानेच असा निर्णय दिला असेल, तर हिंदूंनी कुणाकडे आशेने पहावे ?

शासकीय निधी राष्ट्रीयकृत बँकांमध्येच ठेवण्याचा राज्य सरकारचा आदेश

देशातील काही खासगी बँकांमधील घोटाळे उघडकीस आल्यानंतर शासकीय निधी राष्ट्रीयकृत बँकांमध्येच ठेवण्यात यावा, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे.

शिवजयंतीच्या औचित्यावर खेडी खुर्द (जिल्हा जळगाव) येथे धर्मप्रेमींनी स्वयंस्फूर्तीने लावला ‘हिंदु राष्ट्र’चा फलक !

हिंदु राष्ट्राविषयी तळमळ असणार्‍या खेडी खुर्द गावातील सर्व धर्मप्रेमी बांधवांचे अभिनंदन ! असे धर्मप्रेमी, हीच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे ! सर्वत्रच्या धर्मप्रेमींनी यातून बोध घ्यावा !

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आतापासूनच सिद्धता करा !

भावी आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी अखिल मानवजातीला आतापासूनच सिद्धता करण्याविषयी मार्गदर्शन करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

धर्मप्रचारासाठी महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये गेल्यावर लक्षात आलेला धर्मांधांचा उद्दामपणा आणि हिंदूंची दुःस्थिती !

‘मी काही मासांपासून महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये धर्मप्रसाराच्या सेवेसाठी जात आहेे. तेथील विविध राजकीय, आध्यात्मिक आणि सामाजिक स्थितींविषयी लक्षात आलेले प्रसंग, तसेच धर्मांधांचा उद्दामपणा अन् हिंदूंची दुःस्थिती यांविषयीच्या प्रसंगांचा ऊहापोह प्रस्तुत लेखात केला आहे.

वर्ष २०१८ मध्ये देशभरात १ लाख ४१ सहस्र ७६४ बालकांचा झाला लैंगिक छळ !

देशात बाल लैंगिक छळाचे प्रकार वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही लहान मुलांच्या लैंगिक छळाच्या घटनांत होणारी वाढ चिंताजनक असल्याचे म्हटले होते…..

अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाडा यांवर अन्याय, तर पश्‍चिम महाराष्ट्राला सरकारने भरपूर निधी दिला ! – देवेंद्र फडणवीस

विदर्भ आणि मराठवाडा यांवर जिल्हा योजनांमध्ये अन्याय झाला असून पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागांना सरकारने भरपूर निधी दिला आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १३ मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या प्रश्‍नांना दिलेल्या उत्तराने समाधान न …

इतिहास, परंपरा, संस्कृती, धर्म, भाषा आणि श्रद्धा यांविषयी असलेली एकात्मतेची भावना म्हणजे राष्ट्र होय ! –  चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

‘देश’ हा शब्द ‘दिशा’ या शब्दापासून सिद्ध झाला असून तो ४ दिशांच्या मधील सुनिश्‍चित भूभाग असतो. राष्ट्र ही संकल्पना भौगोलिक नाही, तर सांस्कृतिक आहे. देशाचा इतिहास, परंपरा, संस्कृती, धर्म, भाषा आणि श्रद्धा यांविषयी असलेली एकात्मतेची भावना म्हणजे राष्ट्र होय. आपल्यात राष्ट्रभावना आहे; म्हणून आपण गंगेला नदी न मानता ‘देवी’ मानतो……..

चेन्नई येथे अट्टुकल पोंगलनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन

‘सत्संगम’ या आध्यात्मिक संस्थेने ९ मार्च २०२० या दिवशी चेन्नईच्या मीनाबक्कम् येथील ए.एम्. जैन महाविद्यालयाच्या पटांगणावर अट्टुकल पोंगलचे आयोजन केले होते. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले……