‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद’ असा नामांतराचा ठराव संमत

विधानसभेत १३ मार्च या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा नियम ११० अन्वये संभाजीनगर विमानतळास ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद’ अशा नामांतराचा प्रस्ताव मांडला.

अंकित शर्मा यांची अमानुषपणे हत्या केल्याची सलमान याची स्वीकृती

गुप्तचर विभागाचे पोलीस अंकित शर्मा यांच्या हत्येच्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी सलमान याने त्याच्या चौकशीत हत्येविषयी अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.

कोरोनामुळे महाराष्ट्र, केरळ आणि देहली यांसह काही राज्यांत चित्रपटगृहे बंद, शाळांनाही सुट्टी

देहलीचे ‘आप’ सरकार शाहीन बागचे आंदोलन बंद करायला लावणार का ?

चीनमध्ये कोरोना विषाणू पसरवण्यात अमेरिकेच्या सैन्याचा हात ! – चीनचा आरोप

‘चीन जैविक अस्त्र बनवतांना ते फुटले आणि त्यामुळे कोरोनाचा फैलाव झाला’, असा आरोप चीनवर केला जात आहे. त्यामुळे चीनने प्रथम इतरांवर आरोप करण्यापेक्षा याचे उत्तर द्यावे !

फारूख अब्दुल्ला यांची ७ मासांनंतर नजरकैदेतून सुटका

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे वरिष्ठ नेते फारूख अब्दुल्ला यांची ७ मासांनंतर नजरकैदेतून सुटका करण्यात आली. याविषयीचा अधिकृत आदेश जम्मू-काश्मीर सरकारने जारी केला आहे.

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ

सरकारी कर्मचार्‍यांच्या भत्त्यात वाढ करण्यात येते; मात्र ‘त्यांच्याकडून वेतनाच्या तुलनेत काम केले जाते का ?, हेही सरकारने पाहिले पाहिजे’, असे जनतेला वाटते !