कोटी कोटी प्रणाम !

• आज तुकारामबीज
• प.पू. साटम महाराज, दाणोली, सिंधुदुर्ग यांची आज पुण्यतिथी
• मुंबई येथील प.पू. भाऊ करंदीकर यांची आज पुण्यतिथी
• अमरावती येथील सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर यांचा आज वाढदिवस !

मध्यप्रदेशातील काँग्रेसचे सरकार कोसळणार !

काँग्रेसच्या ६ मंत्र्यांसह २२ आमदारांचे त्यागपत्र ! भाजप आणि काँग्रेस हे दोन भिन्न विचारप्रणाली असणारे पक्ष आहेत. काँग्रेसी मानसिकता असणार्‍या राजकारण्यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यास असले निधर्मी राजकारणी हिंदुत्वाशी एकनिष्ठता दाखवतील का ? याचा भाजपने विचार करूनच पुढचे पाऊल उचलावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

हरिद्वार येथील ‘मातृ सदन’चे स्वामी शिवानंद सरस्वती यांचे आमरण उपोषण

गंगानदी अविरत वहाण्यासाठीची मागणी : गंगानदीच्या रक्षणासाठी समर्पित असणार्‍या येथील ‘मातृ सदन’ आश्रमाचे परमाध्यक्ष स्वामी शिवानंद सरस्वती यांनी त्यांचे शिष्य आत्मबोधानंद यांचे उपोषण समाप्त झाल्यानंतर १० मार्चपासून स्वतः आमरण उपोषण चालू केले आहे.

पोलिसांवर आश्रमातील मुलांना ‘पॉर्न’ व्हिडिओ दाखवल्यावरून गुन्हा नोंद !

स्वामी नित्यानंद यांची चौकशी करणार्‍या पोलिसांचे कृत्य : या घटनेतून पोलिसांची विकृत आणि गुन्हेगारी वृत्ती दिसून येते ! पोलीस एखाद्या संतांना किंवा आध्यात्मिक संस्थेला उद्ध्वस्त करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे यातून स्पष्ट होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहीम’

‘खडकवासला जलाशय रक्षण मोहीम’ ! जलप्रदूषण रोखून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मोहिमेत सहभागी व्हा !

ज्योतिषशास्त्रावर संशोधन करणारी एकही शासकीय संस्था नाही, हे देशाचे दुर्दैव ! – आचार्य नित्यानंदगिरि महाराज

वृंदावन येथील आंतरराष्ट्रीय ज्योतिष आणि वास्तू संमेलन : ज्योतिषशास्त्र ही हिंदु समाजाची जीवनरेखा आहे. संपूर्ण भारतात ज्योतिषशास्त्रावर संशोधन करणारी एकही शासकीय संस्था नाही, हे या देशाचे दुर्दैव आहे, अशी खंत वृंदावन येथील श्री धामचे कथावाचक आचार्य नित्यानंदगिरि महाराज यांनी येथे व्यक्त केली.

‘कोरोना’सारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नित्य अग्निहोत्र करा !

‘विश्‍व अग्निहोत्रदिना’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे नागरिकांना आवाहन ! सध्याच्या घडीला जगभरात थैमान घातलेल्या ‘कोरोना’ विषाणूंच्या संकटावर ‘अग्निहोत्र’ हा रामबाण उपाय ठरू शकतो. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला हा विधी सर्व नागरिकांनी मनोभावे करावा.

चिंचवड (पुणे) येथील पू. (श्रीमती) सुलभा जोशीआजी (वय ७९ वर्षे) संतपदी विराजमान !

धूलिवंदनाच्या दिवशी पुणे येथील साधक भक्तीरंगात न्हाले ! धूलिवंदनाचा दिवस येथील साधकांसाठी भावभक्तीच्या विविध रंगांची उधळण करणारा ठरला ! श्रीमती सुलभा जोशीआजी (वय ७९ वर्षे) यांना सनातनच्या १०४ व्या संत (व्यष्टी संत) म्हणून घोषित करण्यात आले !

राज्यात विविध शासकीय विभागांमध्ये २ लाख १९३ पदे रिक्त गृह, सार्वजनिक आरोग्य विभाग येथे सर्वाधिक जागा रिक्त

बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी राज्य सरकारकडे राज्यातील जिल्हा परिषदा आणि विविध शासकीय विभाग यांमध्ये किती पदे रिक्त आहेत, याची माहिती मागवली होती.

हिंदु जनजागृती समितीने दिलेले विषय काळजाला भिडणारे असून त्यात जातीने लक्ष घालू ! – भाजपचे आमदार महेश लांडगे

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे आणि श्री. सतीश सोनार यांनी भाजपचे आमदार श्री. महेश लांडगे यांची नुकतीच विधानभवनात भेट घेतली.