उमेदवारांवरील गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रे आणि सामाजिक माध्यमे यांवर प्रसिद्ध करा !

राजकारणाचे वाढते गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी मुळात अशांना उमेदवारीच देण्यात येऊ नये, असे कायदे करणे आवश्यक आहे ! महत्त्वाचे म्हणजे न्यायालयाला असा आदेश द्यावा का लागतो ? राजकीय पक्ष अशा उमेदवारांची माहिती प्रकाशित करत नाहीत, याचा अर्थ त्यांना ती माहिती लपवून जनतेची दिशाभूल करायची आहे, असे आहे !

लक्ष्मणपुरी येथे न्यायालयात गावठी बॉम्बद्वारे झालेल्या आक्रमणात अनेक अधिवक्ते घायाळ

जर अधिवक्त्यांमधील पूर्ववैमनस्यामुळे असे आक्रमण झाले असेल, तर ते गंभीर आहे. स्वतःला कायद्याचे ठेकेदार समजणारेच जर अशा प्रकारे सहकार्‍यांवर आक्रमण करण्याचा कट रचत असतील, तर ते सामाजिक स्वास्थ्यासाठी धोकादायक आहे !

बंदीविषयीच्या कायदेशीर प्रक्रियेचा तपशील सादर करण्याचे न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था आहे. बॉम्बस्फोटासारख्या अवैध घटनांशी सनातन संस्थेचा कोणताही संबंध नाही. सनातन संस्थेचे कार्य अत्यंत पारदर्शक आहे. यासाठी सनातन संस्था न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्यास कधीही सिद्ध आहे. न्यायालयीन प्रक्रियेतही सनातन संस्थेचे निर्दोषत्व सिद्ध होईलच !

सरकारी शाळांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी आदींच्या प्रतिमा काढा !

काँग्रेस स्वातंत्र्यापूर्वीपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा द्वेष करत आली आहे; मात्र सावरकर यांच्याविषयी जनतेच्या मनात असलेला आदरभाव जराही अल्प झालेला नसून उलट त्यांची कीर्ती वाढतच आहे, हे तिच्या लक्षात येईल तो सुदिन !

श्री सरस्वतीदेवीचे चित्र असणार्‍या माहितीपत्रिकेचे वितरण करणार्‍या शिक्षकांवर कारवाई

केरळमधील साम्यवादी सरकारच्या मुसलमानबहुल सरकारी शाळेतील प्रकार : केरळमध्ये मंदिरांमध्ये इफ्तार पार्टी केली, तर तो धार्मिक सौहार्द ठरतो; मात्र मुसलमान विद्यार्थ्यांचा भरणा असलेल्या सरकारी शाळेत श्री सरस्वतीदेवीच्या चित्रांचे वाटप केल्यास ती धर्मांध कृती ठरते, असे केरळ सरकार समजते, हे यातून स्पष्ट होते !

हिंदु जनजागृती समिती देशहिताचे कार्य करत आहे ! – रमणभाई पाटकर, वन आणि आदिवासी कल्याण राज्यमंत्री, गुजरात

मरोली (गुजरात) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), तीन तलाक कायदा करणे, तसेच ३७० कलम रहित करणे हे केंद्रशासनाच्या दृढ मनोबळामुळेच शक्य झाले आहे. हिंदु जनजागृती समितीही असेच देशहिताचे कार्य करत आहे, याचा मला आनंद वाटतो – श्री. रमणभाई पाटकर, गुजरात राज्य वन आणि आदिवासी कल्याण राज्यमंत्री

आसाममधील भाजप सरकारकडून निधीअभावी सरकारी मदरसे आणि संस्कृत शाळा बंद करण्यात येणार

आसाममधील भाजप सरकारने मदरसे आणि संस्कृत शाळा यांना एका तराजूत तोलणे, हे अतिशय दुर्दैवी होय ! बहुतांश मदरशांमधून कट्टरतावादी निपजतात; मात्र संस्कृतचे शिक्षण घेऊन सदाचारी पिढी घडते !

ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती सादर करा !

कर्नाटक उच्च न्यायालयाने येथील गोविंदराजनगरमधील कॉर्पोरेशन कॉलनीमध्ये असलेल्या आयशा मशिदीच्या प्रमुखांना नमाजाच्या वेळी मायक्रोफोन आणि ध्वनीक्षेपक वापरण्यास आवश्यक अशी सक्षम अधिकार्‍यांची अनुमती न्यायालयात सादर करा, असा आदेश दिला आहे.

बांगलादेशातील शालेय पुस्तकांत इस्लामी शिकवण देणार्‍या लेखनाचा समावेश ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

बांगलादेशमधील तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकारने शालेय पुस्तकांत पालट करून इस्लामची शिकवण देणार्‍या लेखनाचा समावेश केला आहे. तेथील शालेय पुस्तकांमध्ये बिगर मुसलमानांकडून लिहिले गेलेले लिखाण पालटून मुसलमानांनी लिहिलेले लिखाण अंतर्भूत करण्यात आले आहे