काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या नियतकालिकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘माफीवीर’ असा उल्लेख

प्रखर राष्ट्रभक्त असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर विविध माध्यमांतून सातत्याने टीका करून काँग्रेसने तिची हीन आणि राष्ट्रघातकी वृत्तीच दाखवली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाच नव्हे, तर कोणत्याही राष्ट्रपुरुषांचा असा होणारा अवमान कायमचा थांबवण्यासाठी केंद्रशासनाने नवा कायदा करून त्यात कठोर कारवाई करण्याची तरतूद करावी.

सिंध परत मिळवण्याची जिद्द प्रत्येक हिंदूने बाळगली पाहिजे ! – डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक

फाळणीमुळे सिंध प्रांत पाकिस्तानात गेला; परंतु ‘सिंध आपला आहे’, ही भावना प्रत्येक भारतियाने, हिंदूने मनात बाळगली पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीलाही सांगितली पाहिजे. सर्वांना एकत्र आणून आपले हरवलेले वैभव पुन्हा प्राप्त करता येते, हे इस्रायलने दाखवून दिले आहे.

संकेतस्थळांवरील लहान मुलांच्या अश्‍लील व्हिडिओंच्या प्रसारावर बंदी घालण्यासाठी बैठक बोलवा ! – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश

न्यायालयाला असा आदेश का द्यावा लागतो ? सरकारने स्वतःहून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! बालकांसह महिलांवरील अत्याचारांचे वाढते गुन्हे पाहता शासनाने ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’सह अश्‍लीलता पसरवणार्‍या सर्वच माध्यमांच्या विरोधात कठोर पावले उचलणे अपेक्षित आहे !

युवतींवरील अत्याचाराला पूरक ठरणारी ‘व्हॅलेंटाईन डे’ची विकृती बंद करा ! – हिंदु जनजागृती समिती

१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. ज्या व्हॅलेंटाईनला ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप यांनीच ‘या नावाचा कोणी संत नाही’, असे सांगून रोमन दिनदर्शिकेतून कधीच हटवले आहे

जिहादी आतंकवादी हाफिज सईद याला ११ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘आम्ही आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करतो’, हे दाखवण्यासाठी पाक अशी तोंडदेखली कृती करत आहे. सईद आणि पाक सरकार अन् पाक सैन्य यांचे साटेलोटे असल्यामुळे तो कारागृहात किती काळ राहील, हा प्रश्‍नच आहे. अशा कारवायांवर समाधान न मानता सईद याला भारतात आणून त्याला शिक्षा करावी,

चेन्नई येथील पुस्तक मेळाव्यात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

येथील वाय.एम्.सी.ए. येथे ९ जानेवारी ते २१ जानेवारी २०२० या कालावधीत आयोजित केलेल्या ४३ व्या पुस्तक मेळाव्यात ग्रंथप्रदर्शनामध्ये सनातन संस्थेने सहभाग घेतला. या ग्रंथप्रदर्शनातील ‘कंदालगम’ कक्षावर तमिळ भाषेतील सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ ठेवण्यात आले होते.

चेन्नई येथे शिवसेनेच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वभावदोष निर्मूलनाविषयी मार्गदर्शन

पुरासवक्कम येथील मुरदीस हॉटेलमध्ये २६ जानेवारी २०२० या दिवशी शिवसेनेकडून स्थानिक शिवसैनिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या वेळी उपस्थित शिवसैनिकांसाठी ‘स्वभावदोष निर्मूलन’ या विषयावर व्याख्यान घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

सनातनचे साधक वानरसेनेप्रमाणे प्रभु श्रीरामाचेच कार्य करत आहेत ! – श्री श्री १०८ हनुमानदासजी महाराज टाटंबरी, उत्तरप्रदेश

तुमचे हे राष्ट्रजागृतीचे पवित्र कार्य पाहून मी धन्य झालो. मी खर्‍या अर्थाने आध्यात्मिक जगात जगत आहे, असा अनुभव येथे होत आहे. केवळ येथेच मी पाहिले की, येथील एक एक शब्द राष्ट्रप्रेमाने भरलेला आहे. सनातनचे साधक वानरसेनेप्रमाणे प्रभु श्रीरामाचेच कार्य करत आहेत.

१४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन द्या !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन द्यावे

गोव्यातील चर्च संस्थेने त्यांच्या ‘पी.एफ.्आय.’शी असलेल्या संबंधांविषयी भारतियांना माहिती द्यावी ! – ‘गोवा क्रॉनिकल’चे संपादक साविओ यांची मागणी

‘चर्च संस्थेने ‘पी.एफ्.आय.’शी संबंध ठेवल्याविषयी भारतियांना माहिती द्यावी’, अशी मागणी ‘गोवा क्रॉनिकल’चे संपादक साविओ यांनी गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव यांच्याकडे केली.