गेल्या ५ वर्षांत जे.एन्.यू.ला अनुदानापोटी देण्यात आले १ सहस्र ५१५ कोटी रुपये !

राष्ट्रहितार्थ अशा अनेक योजना आहेत, ज्या निधीच्या अभावी रखडल्या आहेत. जे.एन्.यू.ला निधी देण्याऐवजी तो या योजनांना वळवला असता, तर देशाचे भले झाले असते ! अशा विद्यापिठांना दिल्या जाणार्‍या अनुदानाची फलनिष्पत्ती काय आहे, याची राष्ट्रहितार्थ पडताळणी सरकार आणि प्रशासन यांनी करायला हवी !

मंदिरांमधून मिळणारा पैसा अन्य धर्मासाठी वापरला जाणार नाही ! – धर्मादायमंत्री, कर्नाटक

कर्नाटकातील भाजप सरकारचा हा स्तुत्य निर्णय आहे.  पूर्वीच्या काळी राजे मंदिरांना दान करत होते, आताही सरकारने मंदिरांच्या जीर्णोद्धारांसाठी आणि सोयीसुविधांसाठी आर्थिक साहाय्य केले पाहिजे !

कायद्यामध्ये व्याख्या नसली, तरी केरळमध्ये ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात ! – भाजपचे नेते पी. कृष्णदास

‘लव्ह जिहाद’विषयी केंद्र सरकारच्या भूमिकेवर भाजपच्या नेत्याचे वक्तव्य : स्वपक्षातील नेत्याच्या या विधानाची भाजप सरकारने नोंद घ्यावी ! ‘लव्ह जिहाद’ ही राष्ट्रीय समस्या असून त्याचा राष्ट्रीय सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने याविषयी कठोर भूमिका घेणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !

लव्ह जिहादकडे दुर्लक्ष म्हणजे त्याला मूकसंमती ! – केरळ कॅथॉलिक बिशप कौन्सिल

दक्षिणेकडील राज्यांतील तरुणी युद्धग्रस्त राष्ट्रांमध्ये लैंगिक गुलाम म्हणून वापरल्या जाण्याच्या घटना या वास्तववादी आहेत आणि त्यांच्याकडे डोळेझाक करणे, म्हणजे त्यास मूकसंमती देण्यासारखे आहे, असे केरळमधील चर्चच्या वरिष्ठ पाद्रयांनी म्हटले आहे.

चीन सरकारकडून मांसाहार सोडून शाकाहार करण्याचा जनतेला आदेश

कोरोना विषाणूंचा परिणाम : हिंदु धर्मामध्ये शाकाहाराचे महत्त्व सांगण्यात आले आहे. मांसाद्वारे कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे मांसाहाराचे दुष्परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित होतात !

शाकाहार, योगाभ्यास आणि ध्यान हे माझ्या यशाचे रहस्य ! – प्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविच

ऑस्ट्रेलियन ओपन ही टेनिस स्पर्धा ८ वेळा जिंकणारे सर्बिया देशाचे टेनिसपटू नोवाक जोकोविच यांनी त्यांच्या यशाचे श्रेय शाकाहार, योगाभ्यास आणि ध्यान यांना दिले आहे. तसेच ‘मी अन्य खेळाडूंनाही यासाठी प्रेरित करू इच्छितो’, असेही त्यांनी म्हटले आहे.

आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या नेत्यांचे पी.एफ्.आय.च्या प्रमुखांशी संबंध

शाहीन बागच्या आंदोलनाला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून पैसे ! – अंमलबजावणी संचालनालय

देशभरात ४ सहस्र ८७८ मदरशांची नोंदणी नाही ! – केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाची माहिती

वर्ष २०१८-१९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार देशभरात २४ सहस्र १० मदरसे असून १९ सहस्र १३२ मदरशांची नोंदणी केलेली आहे. याचाच अर्थ ४ सहस्र ८७८ मदरशांनी नोंदणी केलेली नाही, अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली आहे.

बँकांची अनुत्पादक मालमत्ता ७ लाख २७ सहस्र २९६ कोटी रुपये ! – अर्थमंत्रालयाची माहिती

बँकांची अनुत्पादक मालमत्ता (एन्.पी.ए.) सप्टेंबर २०१९ नुसार ७ लाख २७ सहस्र २९६ कोटी रुपये इतकी झाली आहे. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत काही खासगी नागरी बँका आणि वित्तीय संस्था यांच्यामध्ये झालेल्या घोटाळ्याची रक्कम १ लाख १३ सहस्र ३७४ कोटी रुपये इतकी आहे