परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मिळालेला संत आणि उत्तरदायी साधक यांचा सत्संग अन् भाववृद्धी सत्संग यांमुळे सौ. लवनिता डूर् यांच्यात झालेले पालट आणि त्या संदर्भात त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘मी गर्भवती असल्याने मागील दीड-दोन वर्षांपासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाऊ शकले नव्हते. असे असले, तरीही ‘माझ्यात सकारात्मक पालट होत असून माझी साधना पूर्वीपेक्षा चांगली होत आहे’, असे माझ्या लक्षात आले. मला या गोष्टीचे पुष्कळ आश्‍चर्य वाटत होतेे.

घराच्या जवळ असलेल्या सदनिकेत घरगुती वापराच्या गॅस नलिकेत (‘पाईप लाईन’मध्ये) गळती झाल्याने मोठा स्फोट होणे आणि ईश्‍वराच्या कृपेने साधकाच्या घरी कोणतीही मोठी हानी न होणे

आम्ही ज्या इमारतीत राहतो, त्याच्या समोर असलेल्या सदनिकेत एक मोठा स्फोट झाला. ही सदनिका आमच्या घरापासून केवळ २० मीटर अंतरावर आहे. घरगुती वापराच्या गॅस नलिकेत (‘पाईप लाईन’ मध्ये) गळती झाल्याने झालेल्या या स्फोटाचा आवाज प्रचंड मोठा होता.