जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या गोळीबारात ३ आतंकवादी ठार

भारतीय सैन्याने १२ जानेवारीला सकाळी पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये लपून बसलेल्या ३ आतंकवाद्यांना ठार केले आहे. या कारवाईनंतर सैन्याने पुन्हा एकदा त्राल परिसरात शोधमोहीम चालू केली आहे.

धाराशिव येथील संत गोरोबाकाका साहित्य नगरीमध्ये मराठी साहित्य संमेलनाचा समारोप

येथील संत गोरोबाकाका साहित्य नगरी येथे १० जानेवारीपासून चालू झालेल्या ३ दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप १२ जानेवारी या दिवशी करण्यात आला. समारोप प्रसंगी एकूण २० ठरावांचे वाचन करण्यात आले; मात्र अनेक मराठीप्रेमी आणि सावरकरप्रेमी यांची मागणी असलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाच्या निषेधाचा ठराव करण्यात आला नाही.

ख्रिस्ती मुख्यमंत्र्यांच्या आंध्रप्रदेशमध्ये हिंदूंना लागू केलेला ‘जिझिया’ कर जाणा !

आंध्रप्रदेश प्रशासनाने मकरसंक्रांतीच्या काळात भाविकांसाठी अधिक बसगाड्या सोडण्याची व्यवस्था केली आहे; मात्र त्यासाठी प्रवासी भाड्यामध्ये ५० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. गतवर्षीही अशाच प्रकारे भाडेवाढ करण्यात आली होती.

भारताकडून इराणसारखी चूक होणार नाही ! – सैन्यदलप्रमुख नरवणे

भारतातील ‘एअर डिफेन्स कमांड’मुळे भारताकडून इराणसारखी चूक कधीही होऊ शकणार नाही, असे सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितले आहे.

पू. पृथ्वीराज हजारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच एक रूप असल्याविषयी आधुनिक वैद्या (कु.) आरती तिवारी यांना आलेली प्रचीती !

पौष कृष्ण पक्ष तृतीया (१३.१.२०२०) या दिवशी पू. पृथ्वीराज हजारे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी केलेले मार्गदर्शन आणि त्याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून सेवेची अमूल्य संधी देऊन त्या माध्यमातून साधना करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

१२ जानेवारी २०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीचा २० वा वर्धापनदिन सोहळा झाला. त्यानिमित्ताने आवृत्तीची सेवा करणार्‍या साधिका सौ. स्नेहल संतोष गांधी यांनी परात्पर गुरुदेवांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता येथे देत आहोत.

अध्यात्माच्या नावावर लोकांना अयोग्य मार्गदर्शन करून त्यांची दिशाभूल करणार्‍या विदेशांतील काही आध्यात्मिक संघटना

एस्.एस्.आर्.एफ्. सध्या विविध प्रदर्शनांमध्ये (फेअर्समध्ये) सहभागी होत असून तेथे प्रवचने आयोजित करत आहे. अभ्यास करण्याच्या हेतूने तेथील इतर आध्यात्मिक संघटनांनी आयोजित केलेल्या व्याख्यानांना आम्ही उपस्थित राहत होतो.

पू. देयान ग्लेश्‍चिच यांना संत घोषित करण्याच्या संदर्भात श्री. रवी देसाई यांना मिळालेल्या पूर्वसूचना

३.१.२०२० या दिवशी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधनावृद्धी शिबिराला आरंभ झाला. शिबिराच्या उद्घाटनाच्या प्रसंगी श्री. देयान ग्लेश्‍चिच यांना संत म्हणून घोषित करण्यात आले. तत्पूर्वी मी पू. देयानदादा यांच्या समवेत सेवा करतांना विविध प्रसंगांमध्ये ते करत असलेले साधनेसाठीचे प्रयत्न मला आठवले.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. इव्होन प्रेगेंझर यांना आलेल्या अनुभूती

‘३०.१२.२०१९ या दिवशी मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. यज्ञाला आरंभ झाल्यावर मला पुष्कळ झोप येऊ लागली आणि मनात अनावश्यक विचारांचे प्रमाण वाढले.

व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथील एका प्रदर्शनाच्या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की यांना ‘प्रत्येक जिवात ईश्‍वरीतत्त्व आहे’ या संदर्भात आलेल्या अनुभूती !

नोव्हेंबर २०१९ या मासात व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे ‘अध्यात्म आणि आध्यात्मिक उपाय’ या विषयावर एक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आम्ही या प्रदर्शनात सहभागी झालो होतो.