नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी म. गांधी यांनी जे सांगितले, त्याचे आम्ही पालन केले ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

देशाची फाळणी झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये राहिलेल्या ज्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले, त्यांना भारताचे नागरिकत्व द्यायला हवे, असे म. गांधी आणि अन्य ज्येष्ठ नेते यांचे मत होते.

राष्ट्र, धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेची संधी गमावू नये ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठी

आज राष्ट्र धर्मासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. ही आव्हाने समजून घेतली पाहिजेत. आपण नेहमी सत्ता पालटतो; परंतु देशाची व्यवस्था पालटली जात नाही. औरंगजेबाच्या काळात जेवढा विध्वंस झाला नाही, तेवढा विध्वंस स्वतंत्र देशात काश्मीरमध्ये झाला आहे.

कृतज्ञताभावाचे मूर्तीमंत रूप असणार्‍या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांचा देह पंचतत्त्वांत विलीन !

पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी (वय ९६ वर्षे) यांनी पौष पौर्णिमा, म्हणजेच १० जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या देवद आश्रमात देहत्याग केला. ११ जानेवारी या दिवशी देवद येथील स्मशानभूमीत २ वाजून २५ मिनिटांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाकने आतंकवाद्यांना साहाय्य करू नये ! – अमेरिकेतील पाक नागरिकांची मागणी

पाक अमेरिकेचे ऐकत नाही, आंतरराष्ट्रीय संघटनांचे ऐकत नाही, तेथे या नागरिकांचे तो ऐकणार आहे का ? स्वत:च्या नागरिकांचे न ऐकणारा पाक अन्य देशांचे कधी ऐकेल का ?

फाळणीच्या वेळी हिंदू आणि मुसलमान यांचे संपूर्ण स्थलांतर करण्यास डॉ. आंबेडकर सांगत होते ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

डॉ. आंबेडकर यांची मागणी नेहरूंनी फेटाळल्याची माहिती

खर्‍या विवेकाचा आवाज !

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ५६ पानी भाषणांतून जुने-जाणते (?) ज्ञान पाजळल्यानंतर त्याविरुद्ध आता साहित्यिकांमधूनच निषेधाचे सूर उमटत आहेत.

धर्माची हानी रोखण्यासाठी आचारधर्माचे पालन करावेच लागेल ! – करवीरपीठाधीश्‍वर

आपला धर्म हा भोग घेण्यासाठी नाही, तर त्याग करण्यासाठी आहे. ‘ब्राह्मण त्यांच्या कर्तव्यांचे पालन करतात का ?’ याचे आत्मपरीक्षण करावे लागेल. भूषा, भाषा आणि भोजन यांत ब्राह्मण समाजातील काही लोकांचे पतन होत आहे. पुरातन काळापासून ब्राह्मण समाजावरच धर्मपरंपरा जोपासण्याचे दायित्व असून धर्माची हानी रोखण्यासाठी आपल्याला आचारधर्माचे पालन करावेच लागेल, असे परखड मत करवीरपीठाधीश्‍वर विद्यानृसिंहभारती यांनी १२ जानेवारी या दिवशी व्यक्त केले.

पनवेल येथे सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांचा जन्मशताब्दी महोत्सव येथील ज्येष्ठ नागरिक संघात १२ जानेवारी या दिवशी पार पडला. सकाळी ९.३० ते दुपारी ४ या वेळेत या महोत्सवाच्या अंतर्गत विविध कार्यक्रम, तसेच भजने आणि भंडारा यांचे आयोजन करण्यात आले होते.

‘श्री सिद्धीविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधी’चा विधीतील घटक आणि पुरोहित यांच्यावर सकारात्मक परिणाम होणे

‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी यासाठी मयन महर्षींच्या आज्ञेने ९.१०.२०१९ आणि १०.१०.२०१९ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या शुभहस्ते श्री सिध्दीविनायक मूर्तीची चैतन्यमय अन् भावपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली.