…तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू ! – अशोक चव्हाण यांची चेतावणी

महाराष्ट्रात ३ पक्षांचे आणि ३ विचारांचे सरकार चालणार कसे ?, असा प्रश्‍न करत काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी ३ पक्षांच्या सरकारला (महाविकास आघाडी) विरोध केला होता; परंतु आम्ही श्रीमती सोनिया गांधी यांचे मन वळवून त्यांची संमती घेतली. ‘घटनाबाह्य काम करणार नाही’, असे शिवसेनेकडून लिहून घेतले.