देहली आणि गुजरात राज्यांत आतंकवादी आक्रमणाची शक्यता

भारतात घातपात कारवाया करण्यामागे आय.एस्.आय.चा हात असल्याचे ढीगभर पुरावे भारताकडे उपलब्ध आहेत. आता आक्रमणाच्या शक्यतेनंतर राज्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याच्या वरवरच्या उपाययोजनेऐवजी केंद्रशासनाने पाकचा निःपात करून आतंकवादाची समस्याच समूळ नष्ट करणे आवश्यक !

वाराणसी येथील श्री काशी विश्‍वनाथ मंदिरात भाविकांसाठी ‘ड्रेसकोड’

श्री काशी विश्‍वनाथ मंदिर प्रशासनाचा स्तुत्य निर्णय ! मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता जीन्स, पॅन्ट, टी-शर्ट आणि सूट परिधान केलेल्या भाविकांना दर्शन घेता येणार आहे; पण शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेण्याची अनुमती मिळणार नाही. पारंपरिक वस्त्रे परिधान केल्यानंतरच शिवलिंगाला स्पर्श करून दर्शन घेता येणार आहे.

पाकव्याप्त काश्मीर घेण्याची आता वाट पाहू नका ! – अजमेर शरीफ दर्ग्याचे दिवाण सय्यद जैनुल आबेदीन

देशातील किती इमाम, पाद्री किंवा अन्य धार्मिक नेते असे उघडपणे बोलतात ? काँग्रेस आणि कम्युनिस्ट आदी विरोधी पक्ष तरी कधी असे म्हणतात का ?

सैन्यप्रमुखांना पाकव्याप्त काश्मीर घेण्याचे आदेश द्या !

‘तुकडे तुकडे गँग’च्या कानशिलाखाली अखंड भारताचा जाळ उठवला पाहिजे. त्यासाठी जनरल नरवणे यांनी आदेश मागितले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी तसे आदेश द्यावेत, अशी जनभावना आहे, असा घणाघात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

हिंदुत्वनिष्ठांनी #BoycottAmazon ‘हॅशटॅग’ ‘ट्रेंड’ केल्यावर अ‍ॅमेझॉनने हिंदूंच्या देवतांची चित्रे असणारे ‘टॉयलेट मॅट्स’ हटवले !

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी संघटितपणे अन् वैध मार्गाने केलेल्या विरोधाचा परिणाम ! ‘अ‍ॅमेझॉनने ही उत्पादने मागे घेऊन जाहीर क्षमा मागावी’, अशी मागणी करण्यात आली होती. या विरोधानंतर अ‍ॅमेझॉनने काही घंट्यांतच या उत्पादनांची विक्री थांबवली.

भारतात वर्ष २०१८ मध्ये प्रतिदिन झाले १०९ मुलांचे लैंगिक शोषण

वर्षभरात १ लाख १४ सहस्रांहून अधिक गुन्हे नोंद : लक्षावधी वर्षांची महान संस्कृती लाभलेल्या देशात असे हीन कृत्य होणे, हे सर्वांनाच लज्जास्पद ! स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या सरकारी व्यवस्थेने धर्मशिक्षण न दिल्याचा हा परिणामच होय ! असे अपप्रकार टाळण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक !

उत्तरप्रदेश शासनाकडून नागरिकत्व सुधारणा कायद्याची कार्यवाही

४० सहस्र हिंदु शरणार्थींची सूची केंद्रशासनाला पाठवली : उत्तरप्रदेश शासनाने नागरिकत्व सुधारणा कायद्याची कार्यवाही करण्यास प्रारंभ केला. या कायद्याची कार्यवाही करणारे ते पहिले राज्य ठरले आहे.

देहलीतील सरकारी भूमीवरील अवैध मशिदी तोडल्या जाणारच ! – भाजपचे खासदार प्रवेश वर्मा

सरकारी भूमीवर बांधण्यात आलेल्या मशिदी तोडण्यात येतीलच, असे प्रतिपादन देहलीतील भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनी पत्रकार परिषदेत केले.

काही लोकांना ‘हिंदु’ शब्दाची ‘अ‍ॅलर्जी’ ! – उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

भारतात काही लोकांना ‘हिंदु’ या शब्दाची ‘अ‍ॅलर्जी’ आहे. हे योग्य नाही; मात्र त्यांना अशा प्रकारचा दृष्टीकोन ठेवण्याचा अधिकार आहे. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ अन्य धर्मांचा अपमान किंवा तुष्टीकरण करणे, असा होत नाही.