कोटी कोटी प्रणाम !

• प.पू. झुरळे महाराज यांची आज पुण्यतिथी
• सनातनचे २५ वे संत तथा सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांचा आज वाढदिवस

आंध्रप्रदेशमध्ये मकरसंक्रांतीच्या काळात प्रवासी भाड्यामध्ये ५० टक्क्यांनी वाढ

येथील प्रशासनाने मकरसंक्रांतीच्या काळात भाविकांना गर्दीमुळे असुविधा होऊ नये; म्हणून ठिकठिकाणी जाण्यासाठी अधिक बसगाड्या सोडण्याची व्यवस्था केली आहे; मात्र त्यासाठी प्रवासीभाड्यामध्ये ५० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

२ आतंकवाद्यांसह राष्ट्रपतीपदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक

येथील कुलगाम येथून हिजबूल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेच्या २ आतंकवाद्यांसह जम्मू-काश्मीर पोलीसदलाचे राष्ट्रपतीपदक विजेते पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह यांना अटक करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही नावे संतांच्या सूचीत जोडता येतील; कारण त्यांनी सत्याचा अंत पाहिला !’

संतांनी जगण्याचे मर्म सांगितले. जे सत्याचा अंत पाहतात, ते खरे संत आहेत.असे केल्यास डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही नावे संतांच्या सूचीत जोडता येतील; कारण त्यांनी सत्याचा अंत पाहिला.

(म्हणे) ‘मोदी सरकारकडून मुसलमानांना किड्या-मुंग्यांसारखी वागणूक !’

उत्तरप्रदेशसह देशातील अन्य भागात अलीकडच्या घटना पाहिल्यास लक्षात येईल की, पोलिसांना आंदोलकांवर थेट गोळीबार करण्याचे आदेश दिले जात आहेत; मात्र त्यानंतर त्यांना याविषयीही विचारले जात नाही.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी म. गांधी यांनी जे सांगितले, त्याचे आम्ही पालन केले ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

देशाची फाळणी झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये राहिलेल्या ज्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले, त्यांना भारताचे नागरिकत्व द्यायला हवे, असे म. गांधी आणि अन्य ज्येष्ठ नेते यांचे मत होते.

राष्ट्र, धर्म आणि संस्कृती रक्षणासाठी हिंदु राष्ट्र स्थापनेची संधी गमावू नये ! – पुष्पेंद्र कुलश्रेष्ठी

आज राष्ट्र धर्मासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. ही आव्हाने समजून घेतली पाहिजेत. आपण नेहमी सत्ता पालटतो; परंतु देशाची व्यवस्था पालटली जात नाही. औरंगजेबाच्या काळात जेवढा विध्वंस झाला नाही, तेवढा विध्वंस स्वतंत्र देशात काश्मीरमध्ये झाला आहे.

कृतज्ञताभावाचे मूर्तीमंत रूप असणार्‍या सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी यांचा देह पंचतत्त्वांत विलीन !

पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी (वय ९६ वर्षे) यांनी पौष पौर्णिमा, म्हणजेच १० जानेवारी या दिवशी येथील सनातनच्या देवद आश्रमात देहत्याग केला. ११ जानेवारी या दिवशी देवद येथील स्मशानभूमीत २ वाजून २५ मिनिटांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाकने आतंकवाद्यांना साहाय्य करू नये ! – अमेरिकेतील पाक नागरिकांची मागणी

पाक अमेरिकेचे ऐकत नाही, आंतरराष्ट्रीय संघटनांचे ऐकत नाही, तेथे या नागरिकांचे तो ऐकणार आहे का ? स्वत:च्या नागरिकांचे न ऐकणारा पाक अन्य देशांचे कधी ऐकेल का ?