आतंकवाद्यांच्या अटकेचा सूड उगवण्यासाठी जिहाद्यांनी केली पोलीस अधिकार्‍याची हत्या

पोलिसांना ठार मारणारे जिहादी मनोवृत्तीचे धर्मांध समाजाला किती घातक आहेत, हेच यातून दिसून येते ! अशांवर पायबंद घालणे, हे देशाच्या सुरक्षेसाठी अतिशय आवश्यक आहे !

संसदेने आदेश दिल्यावर पाकव्याप्त काश्मीर आपलेच असेल ! – सैन्यदलप्रमुख

‘संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग आहे’, असा संसदीय ठराव आहे. जर संसदेला ते (पाकव्याप्त काश्मीर सहित संपूर्ण जम्मू-काश्मीर) हवे असेल, तर तो भागही (पाकव्याप्त काश्मीरही) आपलाच असायला हवा.

रोहिंग्यांना मुसलमान राष्ट्रांनी स्थान का दिले नाही ? – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ जे हिंदु व्यापारी रस्त्यावर उतरतात, त्यांची नावे धर्मांध सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून त्यांच्यावर बहिष्कार टाकतात. मिझोराममध्ये वर्ष २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर बायबलवर हात ठेवून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यात आली.

‘समाजात संत परंपरेमुळे बुवाबाजीचे प्रस्थ वाढले का ?’ या परिसंवादाला काही जणांकडून विरोध !

आता विरोध करणार्‍यांना ‘फॅसिस्ट’ किंवा ‘असहिष्णु’ असे लेबल चिकटवण्याऐवजी तेथे उपस्थित निधर्मी साहित्यिकांनी या विरोधामागील कारणांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. असे केले, तरच ते योग्य निष्कर्षापर्यंत पोचतील !

युक्रेनचे प्रवासी विमान आम्ही चुकून पाडले ! – इराण

युक्रेन एअरलाइन्सचे प्रवासी विमान आम्ही क्षेपणास्त्राद्वारे केलेल्या आक्रमणात पडले. त्यामुळे विमानातील १७६ जणांचा मृत्यू झाला, अशी स्वीकृती इराणचे राष्ट्रपती हसन रूहानी यांनी ‘ट्वीट’ करत दिली.

देश कोणत्याही हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा नाही ! – माजी संमेलनाध्यक्षा प्रा. अरुणा ढेरे

देश कोणत्याही हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा नाही. असे देशात कधीही होणार नाही. आपण सर्वजण सुजाण माणसे आहोत. फादर दिब्रिटो यांनी अशी आणि राजकीय वक्तव्ये टाळायला हवी होती, अशी टीका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा प्रा. अरुणा ढेरे यांनी केली.

भौतिक प्रदूषणामुळे भारतीय नद्यांपासून मिळणारा आध्यात्मिक लाभ न्यून होतो ! – शंभू गवारे

विदेशी नद्यांच्या तुलनेत भारतीय नद्यांमधील उच्च सात्त्विकता, ही ऋषि आणि भक्त यांच्या साधनेमुळे असलेल्या भारतातील उच्च सात्त्विकतेची निदर्शक आहे. भारतीय नद्या इतक्या प्रदूषित नसत्या, तर या नद्यांचा आध्यात्मिक लाभ पुष्कळ अधिक असता; कारण भौतिक प्रदूषण अशा सात्त्विक नद्यांवर एक सूक्ष्म नकारात्मक आवरण निर्माण करते….

काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दुष्प्रचार करून त्यांना अपकीर्त केले ! – वैद्य उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

जन्मठेपेची शिक्षा भोगतांना अन्य भारतीय राजकीय बंदीवानांच्या सुटकेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रयत्न केले होते. काँग्रेसने त्याचा दुष्प्रचार करून त्यांना अपकीर्त केले. आता भोपाळ येथील काँग्रेस सेवा दलाच्या शिबिरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी हीन दुष्प्रचार करणारी पुस्तके वाटण्यात आली….

नाशिक येथील आप्पासाहेब मते हुतात्मा

जम्मू येथे कर्तव्य बजावत असतांना येथील आप्पासाहेब मधुकर मते हे हुतात्मा झाले आहेत. मते यांचा थंडीमुळे मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. वर्ष २००५ मध्ये ते सैन्यदलात हवालदार म्हणून भरती झाले होते.