बांगलादेशींनी सीमेवर सैनिकांवर आक्रमण करून शस्त्रे पळवली

भारत-बांगलादेश सीमेवरही बांगलादेशी नागरिक अशा प्रकारे उद्दामपणे वागतात, तर भारतातील बांगलादेशी घुसखोर भारतविरोधी कारवाया करतात. हे थांबण्यासाठी बांगलादेशला अद्दल घडवणे आवश्यक !

हिंदूंच्या देवता आणि धर्म यांवर साहित्य संमेलनात टीका नको ! – आनंद हर्डीकर, राजहंस प्रकाशन

हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर साहित्य संमेलनातून टीका न होण्याचे आवाहन करणारे ज्येष्ठ संपादक तथा राजहंस प्रकाशन संस्थेचे श्री. आनंद हर्डीकर यांचे अभिनंदन ! अशा प्रकारे सर्वत्रच्या हिंदूंनी जागरूक राहून आरंभापासूनच आवाहन केले, तर साहित्य संमेलनात हिंदूंच्या देवता आणि धर्म यांवरील टीका टळू शकेल !

इराकमधील अमेरिकेच्या दूतावासाजवळ पुन्हा आक्रमण

इराणने इराकमधील अमेरिकेच्या २ सैन्यतळांवर ८ जानेवारीला २२ क्षेपणास्त्रे डागली होती. त्या पाठोपाठ ८ जानेवारीला रात्री उशिरा येथील सुरक्षेची तटबंदी असलेल्या ‘ग्रीन झोन’मध्ये २ ‘कत्युशा’ क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत.

पाककडून करण्यात येणार्‍या खोट्या आरोपांचे काश्मीरमधील जनतेकडून खंडण ! – राजदूतांच्या शिष्टमंडळाचे प्रतिपादन

राजदूतांच्या शिष्टमंडळाने सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील जनतेने पाकिस्तानकडून करण्यात येणार्‍या आरोपांचे खंडन केले आहे. ‘काश्मीरमध्ये होणार्‍या हत्यांना पाकिस्तानच दोषी आहे. पाकने काश्मीरमध्ये हस्तक्षेप करू नये आणि तसे करण्यासाठी पाकवर दबाव आणावा’, अशी लोकांनी आमच्याकडे मागणी केली.

इराणने अण्वस्त्रांची निर्मिती केल्यास त्याच्यावर आर्थिक निर्बंध लादू ! – ट्रम्प यांची चेतावणी

इराणने अमेरिकेच्या सैन्यतळांवर आक्रमण केल्यानंतर २४ घंट्यांत त्याच्यावर आर्थिक निर्बंध लादण्याची भाषा अमेरिका करते. यातून बोध घेऊन भारतानेही प्रतिदिन घुसखोरी करणार्‍या, तसेच शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्‍या पाकच्या विरोधात कठोर धोरण अवलंबणे आवश्यक आहे !

देहलीमध्ये इस्लामिक स्टेटच्या ३ आतंकवाद्यांना अटक

जिहादी आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत ! देहली पोलिसांच्या विशेष शाखेने इस्लामिक स्टेटच्या ३ आतंकवाद्यांना वाजिराबाद येथून अटक केली. ते नेपाळमार्गे भारतात घुसले होते, तसेच ते देहलीत घातपात करण्यासाठी आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हत्येची धमकी देणार्‍या धर्मांधाला अटक

धर्मांध गुन्हेगारीत अग्रेसर ! या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यामागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र तर नाही ना, याचा पोलिसांनी शोध घेणे आवश्यक !

देश कठीण स्थितीतून जात असतांना शांतता निर्माण करण्याचा उद्देश असावा ! – सरन्यायाधीश शरद बोबडे

सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने म्हटले की, संसदेकडून संमत करण्यात आलेल्या कायद्याला आम्ही घटनात्मक कसे काय घोषित करू शकतो ? न्यायालयाचे काम कायद्याची वैधता निश्‍चित करणे आहे. घटनात्मकता घोषित करणे नाही.

अमेरिका आणि इराण यांनी शांततेसाठी पावले उचलावीत ! – संयुक्त राष्ट्र

अमेरिका आणि इराण यांनी शांततेच्या दिशेने पावले उचलावीत, तरच आखाती देशांमध्ये सर्वकाही ठीक होऊ शकते. जग आता युद्ध सहन करू शकत नाही, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांनी दोन्ही देशांना आवाहन केले आहे.