…तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू ! – अशोक चव्हाण यांची चेतावणी

महाराष्ट्रात ३ पक्षांचे आणि ३ विचारांचे सरकार चालणार कसे ?, असा प्रश्‍न करत काँग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांनी ३ पक्षांच्या सरकारला (महाविकास आघाडी) विरोध केला होता; परंतु आम्ही श्रीमती सोनिया गांधी यांचे मन वळवून त्यांची संमती घेतली. ‘घटनाबाह्य काम करणार नाही’, असे शिवसेनेकडून लिहून घेतले.

‘आनंदी जीवनासाठी साधना’ प्रवचन उपक्रमासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

सनातन संस्थेच्या वतीने सध्या ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावरील प्रवचनांचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रसारसाहित्यासाठी आवश्यकतेनुसार प्रायोजक मिळवून त्यांचा प्रसारासाठी सुयोग्य वापर करावा, असे सनातन संस्थेच्या वतीने कळवण्यात आले आहे.

‘आंदोलन आतंकवादा’च्या माध्यमातून देश अस्थिर करण्याचा प्रयत्न ! – (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

देशात सध्या राष्ट्रप्रेमींना नाही, तर राष्ट्रद्रोहींना महत्त्व आले आहे. अनेक कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संस्था चुकीची कामे करत आहेत.

‘…मग राहुल गांधीनाच प्रथम अंदमान येथील कारागृहात पाठवावे लागेल !’ – रणजीत सावरकर आणि विनोद तावडे यांच्याकडून संजय राऊत यांचे समर्थन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यास विरोध करणार्‍यांना २ दिवसांसाठी अंदमान येथील कारागृहात डांबायला हवे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचे भाजपचे नेते विनोद तावडे आणि सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी स्वागत केले आहे.

.‘फोन पे’ अ‍ॅपद्वारे पोलिसाचेच सव्वादोन लाख रुपये चोरले

पोलीस कर्मचारी वसंत माळी यांच्या चोरीला गेलेल्या भ्रमणभाषमधील ‘फोन पे’ अ‍ॅपचा वापर करून सव्वादोन लाख रुपये काढण्यात आले आहेत. या प्रकरणी डोंगरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोटी कोटी प्रणाम !

• प.पू. झुरळे महाराज यांची आज पुण्यतिथी
• सनातनचे २५ वे संत तथा सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे यांचा आज वाढदिवस

आंध्रप्रदेशमध्ये मकरसंक्रांतीच्या काळात प्रवासी भाड्यामध्ये ५० टक्क्यांनी वाढ

येथील प्रशासनाने मकरसंक्रांतीच्या काळात भाविकांना गर्दीमुळे असुविधा होऊ नये; म्हणून ठिकठिकाणी जाण्यासाठी अधिक बसगाड्या सोडण्याची व्यवस्था केली आहे; मात्र त्यासाठी प्रवासीभाड्यामध्ये ५० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे.

२ आतंकवाद्यांसह राष्ट्रपतीपदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक

येथील कुलगाम येथून हिजबूल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेच्या २ आतंकवाद्यांसह जम्मू-काश्मीर पोलीसदलाचे राष्ट्रपतीपदक विजेते पोलीस उपअधीक्षक देविंदर सिंह यांना अटक करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही नावे संतांच्या सूचीत जोडता येतील; कारण त्यांनी सत्याचा अंत पाहिला !’

संतांनी जगण्याचे मर्म सांगितले. जे सत्याचा अंत पाहतात, ते खरे संत आहेत.असे केल्यास डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचीही नावे संतांच्या सूचीत जोडता येतील; कारण त्यांनी सत्याचा अंत पाहिला.

(म्हणे) ‘मोदी सरकारकडून मुसलमानांना किड्या-मुंग्यांसारखी वागणूक !’

उत्तरप्रदेशसह देशातील अन्य भागात अलीकडच्या घटना पाहिल्यास लक्षात येईल की, पोलिसांना आंदोलकांवर थेट गोळीबार करण्याचे आदेश दिले जात आहेत; मात्र त्यानंतर त्यांना याविषयीही विचारले जात नाही.