केंद्र सरकारने काशी आणि मथुरा येथील मंदिरांची भूमी अधिग्रहित करावी ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी

डॉ. स्वामी नेहमीच हिंदुत्वाची सूत्रे कायद्याच्या आधारे स्पष्ट आणि परखडपणे मांडतात. त्यामुळे अन्य कोणत्याही हिंदुत्वनिष्ठ नेत्याच्या तुलनेत त्यांचे विचार परिणामकारक ठरतात !

अयोध्येत मुसलमानांना भूमी दिल्यास ती मक्का होईल !

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचा पुनरूच्चार ! मुसलमानांना ५ एकर भूमी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळे अयोध्येच्या पवित्र भूमीत आध्यात्मिक संघर्ष निर्माण होऊ शकतो. अयोध्येची पवित्र भूमी ते दुसरी मक्का करतील आणि जगाची आध्यात्मिक राजधानी होऊ घातलेल्या अयोध्येचे मूळतत्त्वच नष्ट होईल.

मुसलमानांनी काशीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील कृष्ण जन्मस्थान हिंदूंना द्यावे !

भारतीय पुरातत्व खात्याचे माजी विभागीय संचालक के.के. महंमद यांचे आवाहन
एक मुसलमान पुरातत्वशास्त्रज्ञ असे सांगतात, याविषयी धर्मांध मुसलमान आणि त्यांचे नेते यांना काय म्हणायचे आहे ?

जमीयत उलेमा-ए-हिंदकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट

रामजन्मभूमी खटल्याच्या निकालाचे प्रकरण : हिंदूंची भूमिका ही सत्याची असल्याने या याचिकेवरील निर्णयही हिंदूंच्याच बाजूने येईल, यात हिंदूंना शंका नाही ! यातून इस्लामी संघटनांची धर्मांधता दिसून येते ! हिंदूंच्या हक्काची रामजन्मभूमी त्यांना सहजासहजी मिळू द्यायची नाही, यासाठी धर्मांध कशा कृती करतात, हेच यातून दिसून येते !

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून मंदिरातील ३३ पुजार्‍यांवर मंदिर प्रवेशबंदीची कारवाई

श्री तुळजाभवानी मंदिरात कार्यरत ३३ पुजार्‍यांच्या विरोधात श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान देऊळ नियमानुसार मंदिर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ३२ पुजार्‍यांना १५ दिवस, तर एका पुजार्‍याला १ मासासाठी मंदिरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

(म्हणे) ‘लोक प्रसिद्धी मिळवत आहेत !’ – सलमान खान

साधू आणि देवता यांचे विडंबन करणार्‍या ‘दबंग ३’ या चित्रपटाला होणारा विरोध : राष्ट्र आणि धर्म यांसाठी निःस्वार्थपणे कार्य करणारे अनेक गोष्टींचा त्याग करून ते कार्य करत असतात. त्यांना प्रसिद्धीची यत्किंचितही अपेक्षा नसते, हे केवळ पैसा आणि प्रसिद्धी सर्वस्व असणार्‍या सलमान खान यांना काय कळणार ?

४० सहस्र कोटी रुपये केंद्र सरकारला परत पाठवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ३ दिवसांचे मुख्यमंत्री झाले !

कर्नाटकातील भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांचा दावा ! ‘बुलेट ट्रेन’साठी आलेला निधी केंद्रात पाठवल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आणि धांदात खोटा आहे. आम्ही एक नवा पैसाही केंद्राला परत केलेला नाही, असे स्पष्टीकरण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये विहिंपच्या जागरूकतेमुळे रोगनिवारण करण्याच्या नावाखाली धर्मांतर करणार्‍या ३ पाद्य्रांना अटक

येथील दरौरा गावात लोकांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे धर्मांतर करण्याच्या प्रकरणी पोलिसांनी कपिलदेव राम, अजय कुमार आणि ओम प्रकाश या ३ पाद्रींना अटक केली आहे. आजार बरे करण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रकार गेले कित्येक काळ चालू आहे.