पाकच्या गोळीबाराला भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ४  सैनिक ठार

पाकने गोळीबार करायचा आणि नंतर भारताने प्रत्युत्तर द्यायचे, हे आणखी किती दिवस चालणार ? त्यापेक्षा ‘पाक’ नावाची डोकेदुखी कायमची दूर केली पाहिजे !

इंग्रजांची ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती विरोधक वापरत आहेत ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सर्वांची प्रगती व्हावी, यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. इंग्रजांनी ‘फोडा आणि राज्य करा’, अशी नीती वापरली अन् आता विरोधकही तीच नीती वापरत आहेत. त्यात ते सफल होणार नाहीत. वैयक्तिक स्वार्थासाठी विरोधक फूट पाडत आहेत, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

(म्हणे) ‘संघाचे पंतप्रधान भारतमातेशी खोटे बोलत आहेत !’ – काँग्रेसचे नेते राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहली येथील सभेत ‘कुठेही स्थानबद्धता छावणी उभारली जात नसून काँग्रेस करत असलेले आरोप खोटे आहेत’, असे म्हटले होते. यावर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीने स्थानबद्धता छावणीसंबंधी केलेला अहवाल (रिपोर्ट) प्रसारित करत मोदी यांच्यावर टीका केली आहे.

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे १० ते २० किलो रुपयांनी चोरीचे कांदे विकणार्‍या दोघांना अटक

६० सहस्र रुपयांचे कांदे चोरी करून प्रती किलो १० ते २० रुपयांनी विकणार्‍या अजय जाटव आणि जीतू वाल्मीकि या दोघा चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. अत्यंत अल्पदरात या चोरांनी कांद्यांची विक्री चालू केल्याचे कळल्यावर लोकांनी ते खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ यांनुसार बांगलादेशात परत न पाठवण्याची वेश्याव्यवसायातून सुटका झालेल्या बांगलादेशी युवतीची याचना !

गोव्यातील वेश्याव्यवसायात बांगलादेशी युवतींचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. देशात ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ लागू झाल्याने आणि ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ कायदा येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर वेश्याव्यवसायातून सुटका झालेल्या युवतींना त्यांना बांगलादेशात परत पाठवले जाणार असल्याची भीती वाटू लागली आहे.

कर्नाटक सरकारने पोलीस गोळीबारात ठार झालेल्या धर्मांधांच्या कुटुंबियांचे अनुदान थांबवले

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात १९ डिसेंबरला झालेल्या हिंसाचारामध्ये पोलिसांच्या गोळीबारात २ धर्मांध ठार झाले होते

बंगालचे मंत्री सिद्दीकुल्ला चौधरी यांना बांगलादेशाने व्हिसा नाकारला

बंगालचे मंत्री सिद्दीकुल्ला चौधरी यांना बांगलादेशाने ६ दिवसांच्या दौर्‍यासाठी व्हिसा देण्यास नकार दिला आहे; मात्र त्याचे कुठलेही कारण देण्यात आले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. ‘दोन्ही देशांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे ही घटना दुर्दैवी आहे.

येशू ख्रिस्ताला समलिंगी दाखवणारी नेटफ्लिक्सवरील मालिका रहित करण्यासाठी लक्षावधी ख्रिस्त्यांचा विरोध

येशू ख्रिस्ताला समलिंगी आणि सेंट मेरी ही मादक द्रव्याचे सेवन करते, असे दाखवणार्‍या ‘द फर्स्ट टेम्प्टेशन ऑफ क्राइस्ट’ (येशू ख्रिस्ताला पडलेली पहिली भुरळ) नावाच्या ‘नेटफ्लिक्स’वरील मालिकेच्या विरोधात ख्रिस्त्यांनी विरोध चालू केला आहे.

उत्तरप्रदेशातील विविध जिल्हा प्रशासनाकडून १३० धर्मांध दंगलखोरांना ५० लाख रुपयांच्या हानीभरपाईसाठी नोटिसा

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी यांविरोधात उत्तरप्रदेशमधील विविध जिल्ह्यांत हिंसाचार करण्यात आला होता. या हिंसाचाराच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी येथील विविध जिल्ह्यातील प्रशासनाने एकूण १३० धर्मांध दंगलखोरांना आर्थिक वसुलीच्या नोटीसा पाठवल्या आहेत.

हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्माच्या वृक्षाची पाळेमुळे घट्ट करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे ! – श्री श्री १००८ महंत श्री प्रताप पुरीजी महाराज

‘हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्माच्या वृक्षाची पाळेमुळे घट्ट करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे, तर समाजात काही लोक हिंदु धर्माची पाळेमुळे उखडून टाकण्याचे काम करत आहेत.