कोटी कोटी प्रणाम !

• आज संत नामदेव महाराज यांची जयंती
• सनातनचे सिंधुदुर्ग येथील ४७ वे संत पू. रघुनाथ राणेआजोबा यांचा आज वाढदिवस

कर्तारपूर कॉरिडॉरमार्गे येणार्‍या भारतियांना पारपत्र अनिवार्य ! – पाक सैन्य

पंतप्रधान इम्रान खान यांच्या निर्णयाच्या विरोधात पाक सैन्याची भूमिका : पाकच्या पंतप्रधानांचा निर्णय पाकचे सैन्य पालटत असेल, तर पाकचा कारभार पाकचे सैन्यच चालवते, हे जगजाहीर होते. त्यामुळे इम्रान खान यांच्याशी भारताने कसलेही राजनैतिक संबंध ठेवू नयेत, हेच स्पष्ट होते !

मला युती तोडायची नाही, भाजपने निर्णय घ्यावा ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

शिवसेनेची निर्मिती स्वाभिमानातून झाली आहे. केवळ भाजपची कोंडी करायची म्हणून हे सगळे करत नाही. जे ठरले तसे असेल, तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दूरभाष करावा. मला ठरल्यापेक्षा एकही कण अधिक नको. मला स्वत:ला युती तोडायची नाही.

कार्तिकी यात्रेनिमित्त श्रीविठ्ठल मंदिर परिसरात नारळ वाढवण्यावर बंदी

नारळ वाढवणे ही हिंदूंच्या धर्मशास्त्रातील एक मंगलमय कृती आहे. धर्मशास्त्र जाणून न घेते दुर्घटनेच्या नावाखाली या कृतीवर बंदी घालणे हा, एकप्रकारे घालाच घातला जात आहे. दुर्घटना होऊ नये, यासाठी प्रशासनाने बंदी घालण्यऐवजी धर्मपालन करण्यास सोयीचे होईल, अशी उपाययोजना काढणे अपेक्षित आहे !

भाजप अल्पमताचे सरकार स्थापन करणार नाही, महायुतीचे शासन येईल ! – सुधीर मुनगंटीवार

शिवसेनेशी सत्तास्थापनेविषयी काही स्तरावर चर्चा चालू आहे. भाजप अल्पमताचे सरकार स्थापन करणार नाही. आम्हाला महायुतीचे शासन आणण्याची इच्छा आहे, असे प्रतिपादन भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

सनातनच्या आश्रमातून होणारे धर्मकार्य संपूर्ण विश्‍वात पसरेल !

‘सनातनचा रामनाथी आश्रम हे शिवक्षेत्र असून या स्थानाला भगवान शिवाचा आशीर्वाद आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे मानवरूपात भगवान शिवच आहेत. आश्रमात होणारे धर्मकार्य तेच करवून घेत आहेत. सनातनच्या सर्व साधकांना माझा पूर्ण आशीर्वाद आहे. – श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामीजी

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे शनिदेवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

येथील फिरोजपूर गावामधील प्राचीन शिव मंदिरातील पिंपळाच्या झाडाखाली असणारी शनिदेवाची मूर्ती अज्ञातांकडून तोडण्यात आली. रात्रीच्या वेळी ही घटना घडली. सकाळी गावातील नागरिक स्वच्छतेसाठी मंदिरात आल्यानंतर हे निदर्शनास आले….

‘पानीपत’ चित्रपट प्रसिद्ध करण्याची ही वेळ नाही ! – अफगाणिस्तान सरकार

अफगाणिस्तानमधील बादशहा अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झालेल्या पानीपतच्या युद्धावरील ‘पानीपत’ नावाचा हिंदी चित्रपट ६ डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहे….

पाटलीपुत्र (बिहार) येथे मूर्ती विसर्जनावर धर्मांधांकडून आक्रमण

येथील बबुआगंजमध्ये ४ नोव्हेंबरच्या रात्री मूर्ती विसर्जनाच्या वेळी धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर हिंसाचार झाला. या वेळी अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. तसेच पोलिसांची एक गाडी जाळण्यात आली. या वेळी धर्मांधांनी गोळीबारही केला.