पाककडून कर्तारपूर कॉरिडॉरच्या प्रचारासाठी खलिस्तानवादी आतंकवाद्यांची छायाचित्रे

कॉरिडॉरच्या जवळच्या परिसरात आतंकवाद्यांचा तळ कार्यरत असणे, खलिस्तानवादी आतंकवाद्यांची छायाचित्रे प्रसारित होणे यातून पाक कॉरिडॉरच्या माध्यमातून भारतावर आतंकवादी कारवाया करू पाहत आहे. यातून पाकचे खायचे आणि दाखवायचे दात हे वेगळेच आहेत, हेच पुन्हा एकदा दिसून येते.

देहलीतील साकेत आणि रोहिणी न्यायालयात अधिवक्त्यांचे आंदोलन

देहली पोलीस आणि अधिवक्ते यांच्यातील संघर्षामुळे न्यायालयीन कामकाज अन् सर्वसामान्य जनता यांच्यावर होणारा परिणाम गंभीर आणि आर्थिक हानी करणारा आहे. त्यामुळे या प्रकरणी केंद्र सरकारने तात्काळ उपाययोजना काढावी, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा !

सत्ताधारी देशाला कुठे घेऊन चालले आहेत ? – रणदीप सूरजेवाला, काँग्रेस

एकीकडे अधिवक्त्यांवर गोळीबार, तर दुसरीकडे पोलिसांना मारहाण होते आहे. कायदा-सुव्यवस्था आणि देहलीचे नागरिक यांचे संरक्षण कोण करणार ? गृहमंत्र्यांनी जनतेसमोर येऊन देहलीत कायदा- सुव्यवस्था कशी राहील ? आणि हा वाद सनदशीर मार्गाने कसा सोडवणार ?, हे सांगावे. – रणदीप सूरजेवाला

जनादेश महायुतीला असल्याने सरकार महायुतीचेच होईल ! – सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते

‘सत्तास्थापनेचा तिढा सुटून गोड बातमी लवकरच कळेल’, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर दिली. ‘भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष लवकरच निवडले जाणार आहेत’, असे मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

नेपाळ बनला जिहादी आतंकवाद्यांचा नवीन अड्डा ! – अमेरिकेचा अहवाल

पाकिस्तानमध्ये ज्या आतंकवादी संघटनांनी आक्रमणे केली, त्यांच्यावरच पाकने कारवाई केली आहे; परंतु ज्या आतंकवादी संघटनांनी भारतात आतंकवादी कारवाया केल्या, आक्रमणे केली, त्यांच्यावर पाककडून मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही, असेही या अहवालात म्हटले आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे मंगलमय वातावरणात शुभागमन !

भक्ताच्या हाकेला सत्वर प्रतिसाद देणारी, त्याच्यावर कृपेचा वर्षाव करणारी, कधी वात्सलमयी, तर कधी रौद्र रूप धारण करून भक्तांचा उद्धार करणार्‍या आदिशक्तीचे ६ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले ! जी शक्ती चराचरात व्यापलेली आहे, ज्या शक्तीच्या योगे सारे विश्‍व संचलित होते, त्या आदिशक्तीच्या चरणी वंदन !

भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्यासाठी श्री काशी विद्वत परिषदेचे पूर्ण समर्थन ! – डॉ. रामनारायण द्विवेदी, मंत्री, श्री काशी विद्वत परिषद

वाराणसी येथे ९ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत हिंदु जनजागृती समितीकडून ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’
१५२ संघटनांच्या ३५० प्रतिनिधींचा सहभाग

मन स्थिर राहण्यासाठी साधना करणे अनिवार्य ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

मनुष्याला सर्व आपण करतो, असे वाटते; प्रत्यक्षात संपूर्ण जगाचा नियंता भगवंत आहे. भगवंताप्रती ही श्रद्धा असणे म्हणजेच साधना होय. मन स्थिर राहण्यासाठी साधना करणे अनिवार्य आहे. गुरूंनी सांगितलेली साधना करतांना मनोलय आणि बुद्धीलय हे टप्पे आपोआप गाठता येतात

मिरज येथे सनातनच्या तीन दिवसीय ‘युवा साधना प्रशिक्षण शिबिरा’स उत्साहात प्रारंभ !

येथील ब्राह्मणपुरीतील सनातनच्या आश्रमात ५ नोव्हेंबरपासून ३ दिवसीय ‘युवा साधना प्रशिक्षण शिबिरास’ उत्साहात प्रारंभ झाला. शिबिरात सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतून युवा साधक आणि धर्मप्रेमी यांनी सहभाग घेतला आहे.

‘संस्कृतीचे दर्शन यापेक्षा विकृतीचे प्रदर्शन’, हा आजच्या करमणुकीचा विषय ! – रवींद्र खरे, भरत नाट्य संशोधन मंदिर संस्थेचे विश्‍वस्त

भरत नाट्य संशोधन मंदिर ही पुण्यातील अग्रणी संस्था यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने ४ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात भरत नाट्य मंदिर येथे पहिल्या संगीत नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.