अधिवक्त्यांवर कारवाई होण्यासाठी शेकडो पोलिसांचे राजधानीत आंदोलन

आंदोलन करतांना पोलिसांकडूनच बेशिस्त वर्तन ! राजधानीतील पोलिसांच्या अशा वर्तनातून देशभरातील पोलिसांना कोणता संदेश जाईल, याचा देहली पोलिसांनी विचार करणे आवश्यक ! कायद्याचे रक्षण करणारेच न्याय मिळण्याची मागणी करू लागले, तर जनतेने कोणाकडे पाहावे ?

उत्तरप्रदेशात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे ४ सहस्र सैनिक तैनात ठेवणार

रामजन्मभूमीच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे ४ सहस्र सैनिक उत्तरप्रदेशात पाठवण्यात आले आहेत. हे सैनिक १८ नोव्हेंबरपर्यंत राज्यात तैनात असतील.

अयोध्येत आक्रमण करण्यासाठी उत्तरप्रदेशात ७ जिहादी आतंकवादी घुसल्याची माहिती

महंमद याकूब, अबू हमजा, महंमद शहाबाज, निसार अहमद आणि महंमद कौमी चौधरी अशी ५ आतंकवाद्यांची नावे : ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे टाहो फोडून सांगणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी, पुरो(अधो)गामी आणि साम्यवादी आता गप्प का ?

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल ! – चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेतील घडामोडी

हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवणारे हिंदुद्रोही पोलीस !

निरपराध्यांचा छळ करून त्यांना गुन्हा स्वीकारण्यास भाग पाडणारे कायदाद्रोही पोलीस ! अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे ! पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.

फुटीरतावाद्यांच्या दगडफेकीत श्रीनगरनजीक २ पर्यटक घायाळ : २२ दिवसांत १२ परप्रांतियांची आतंकवाद्यांकडून हत्या

काश्मीरमधील आतंकवाद संपवण्यासाठी आतंकवाद्यांचा कारखाना असलेल्या पाकवर कारवाई करणे, हाच अंतिम उपाय आहे ! दगडफेक करणार्‍या आतंकवाद्यांना सहानुभूती दर्शवणारे मानवतावादी अशा घटना घडतात, तेव्हा काहीच का बोलत नाहीत ?

काँग्रेसची विचारसरणी ‘फुटीरतावादी’ आणि ‘पाकिस्तानधार्जिणी’ ! – आनंद स्वरूप शुक्ला, भाजप नेते

काँग्रेसची विचारसरणी ‘फुटीरतावादी’ आणि ‘पाकिस्तानधार्जिणी’ आहे. स्वातंत्र्यानंतर देशावर सर्वाधिक काळ राज्य करणार्‍या काँग्रेसने धर्मांधांचे अतीलांगूलचालन केल्यानेच देशाची अतोनात हानी केली. यामुळेच आता काँग्रेसला अखेरची घरघर लागली आहे, हेच सत्य आहे !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘श्री अर्क गणपति पूजन’ आणि ‘श्री कार्तिकेय पूजन’ !

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे आणि साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत यासाठी अन् विश्‍वशांतीसाठी येथील सनातनच्या आश्रमात कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठी म्हणजे २ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘श्री अर्क गणपति पूजन’ केले.

पाकिस्तानातील कर्तारपूर गुरुद्वारा असलेल्या भागात आतंकवाद्यांचे प्रशिक्षणतळ कार्यरत असल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्यात आतंकवाद्यांचे प्रशिक्षणतळ असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. याच जिल्ह्यामध्ये कर्तारपूर साहिब गुरुद्वारा आहे.

‘आसियान’- भारत करारामुळे आर्थिक विकासाला चालना ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

भूपृष्ठीय, हवाई आणि सागरी दळणवळणामुळे भारत अन् आग्नेय आशिया परिषदेतील १० सदस्य राष्ट्रांतील व्यापार आणि आर्थिक विकास यांना चालना मिळेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.