लोकांना मरण्यासाठी सोडले आहे ! – सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर ताशेरे

न्यायमूर्ती म्हणाले, ‘‘आपण आपल्या जीवनातील महत्त्वाची वर्षे यामुळे गमावत आहोत. स्थिती अत्यंत बिकट आहे. केंद्र आणि देहली सरकार काय करू इच्छित आहे ? तुम्ही हे प्रदूषण अल्प करण्यासाठी काय करणार आहात ? . . . आम्ही हे सहन करू शकत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट हसण्यावारी घेत आहात.’’

(म्हणे) ‘भारताचा नवा नकाशा कायदेशीरदृष्ट्या चुकीचा !’

भारताच्या नव्या नकाशात ‘पाकव्याप्त काश्मीर’ भारताचा भाग असल्याचे स्पष्टपणे दाखवल्याने पाकिस्तानचा थयथयाट ! भारताने आता केवळ नकाशापुरते सीमित न राहता ‘पाकव्याप्त काश्मीर’ आणि ‘अक्साई चीन’ यांना प्रत्यक्षातही आपल्या कह्यात घेऊन शत्रूराष्ट्रांना एकदाचा धडा शिकवावा !

धार्मिक सौहार्द राखण्यासाठी भाजपचे मुसलमान नेते प्रयत्न करणार ! – रा.स्व. संघ आणि भाजप

रामजन्मभूमीविषयीच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर मुसलमानांशी धार्मिक सौहार्द राखण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे पदाधिकारी महत्त्वाची भूमिका निभावतील, असे रा.स्व. संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात पार पडलेल्या बैठकीत ठरवण्यात आले.

रामजन्मभूमीच्या निकालाची अयोध्या पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून सर्व स्तरांवर सिद्धता !

आतापर्यंत अनेक कारणांनी रामजन्मभूमीचा प्रश्‍न प्रलंबित राहिल्याने जनभावना अतीतीव्र झाल्या आहेत ! ‘रामजन्मभूमी ही हिंदूंचीच आहे’, हे धडधडीत आणि ऐतिहासिक सत्य असतांना पोलीस अन् प्रशासन यांना एवढी सिद्धता का करावी लागत आहे, याचा प्रशासनाने विचार करावा !

राज्यात लवकरच नवीन शासन स्थापन होईल ! – मुख्यमंत्री फडणवीस

सत्ता स्थापनेवरच बरेचजण बोलत आहेत; मात्र मी त्यावर बोलणार नाही. राज्यात लवकरच नवीन शासन स्थापन होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

श्रीनगरमध्ये आतंकवादी आक्रमणात एकाचा मृत्यू, ३८ घायाळ

मौलाना आझाद रस्त्यावरील बाजारात ४ नोव्हेंबरला दुपारी आतंकवाद्यांनी ग्रेनेडद्वारे आक्रमण केले. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ३८ लोक घायाळ झाले आहेत.

पारंपरिक भजनांचे विडंबन करणार्‍या ‘२०-२०’ आणि ‘आमने-सामने’ यांवर बंदी आणण्याचा भजनी मंडळे अन् हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचा निर्धार

क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे ‘२०-२०’ स्पर्धा होतात त्याप्रमाणे भजनामध्ये पारंपरिक पद्धतीने भजन न गाता काहीजण ती ‘२०-२०’ आणि ‘आमने-सामने’ या नवीन प्रकारात गात आहेत. तसेच यात सभ्यता ओलांडून एकमेकांवर टीका केली जाते. यामध्ये सर्रासपणे शिवीगाळ करणे आणि अश्‍लील शब्दांचा उपयोग केला जातो.

महाराष्ट्रातील जनता आणि हिंदूंचे हित यांसाठी भाजप-शिवसेना यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी ! – हिंदु जनजागृती समिती

. . . संघटित हिंदुशक्तीचे विभाजन होऊ नये, लवकरच सर्वोच्च न्यायालय श्रीरामजन्मभूमीविषयी निकाल देणार आहे. त्यानंतरही देशविरोधी शक्ती देशात अराजक माजवू शकतात. अशा स्थितीत राज्यात स्थिर आणि सक्षम शासन स्थापन होणे आवश्यक आहे, ही राज्यातील हिंदुत्वनिष्ठांची भावना आहे – हिंदु जनजागृती समिती

(म्हणे) ‘रामजन्मभूमी खटल्याच्या सुनावणीच्या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्त संरक्षण द्या !’ – जमियत उलेमा हिंदचे हाफीज इरफान

अयोध्येतील रामजन्मभूमी संदर्भातील अंतिम निर्णय येण्यापूर्वी शहरात अतिरिक्त संरक्षण पुरवण्यात यावे. न्यायालयाच्या निकालापूर्वी ज्या भागांत मुसलमानांची संख्या अधिक आहे, अशा भागांत केंद्रीय अर्ध सैनिक दल (पॅरामिलिट्री फोर्स) तैनात करण्यात यावे

(म्हणे) ‘बँकॉकसह सर्वंकष आर्थिक सहयोग करार केल्यास देशांतर्गत शेतीमालाचे भाव कोसळतील !’

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रादेशिक सर्वंकष आर्थिक सहयोग करारावर (आर्सीईपी) स्वाक्षरी करण्यासाठी बँकॉकला गेले आहेत. या करारामुळे विकसित परराष्ट्रांतील अतिरिक्त शेतीमाल भारतात ओतला जाईल. त्यामुळे देशांतर्गत शेतीमालाचे भाव कोसळतील.