पाककडून सीमेवरील जंगलात आग लावून आतंकवाद्यांना भारतात घुसवण्याचा प्रयत्न !

पाण्यात राहून भारताविरुद्ध युद्ध कसे करायचे, याचेही दिले जात आहे प्रशिक्षण ! युद्धसज्ज पाकला कायमचा धडा शिकवण्यासाठी आता भारतानेही तितक्याच क्षमतेने आक्रमणाचा पर्याय निवडणे आणि यासाठी पाकिस्तानची मानसिकता जाणून तो रचत असलेल्या षड्यंत्रांना निष्फळ करण्यासाठी व्यूहरचना आखणे आवश्यक आहे !

सरकारने यज्ञांचे आयोजन केल्यास प्रदूषणाची समस्या सुटेल ! – सुनील भराला, भाजप नेते

देहलीमधील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ : भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न करणार्‍या मोदी शासनाने आता यज्ञ-यागांचे आयोजन करावे आणि त्याला शासकीय महत्त्व प्राप्त करून द्यावे, अशी सश्रद्ध हिंदूंची अपेक्षा आहे !

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे १२ गायींचे कत्तलीपासून रक्षण

यावरून केवळ गोवंश हत्याबंदी कायदा करून उपयोग नाही, तर त्याची प्रभावी कार्यवाही होणेही आवश्यक आहे !

त्रिपुरामध्ये ख्रिस्ती धर्मांतराला विरोध करणार्‍या हिंदु विद्यार्थ्याची छळ करून हत्या !

ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी किती खालच्या थराला जात आहेत, याचेच हे उदाहरण ! हिंदूंच्या धर्मग्रंथांवर चिखलफेक करणे, हिंदूंचा बुद्धीभेद करणे, त्यांची फसवणूक करणे, अशा नेहमीच्याच साधनांसमवेत आता कोणी धर्मांतरास नकार दिला, तर त्याला ठार मारण्यापर्यंत यांची मजल गेली आहे !

केंद्र सरकारकडून भारताचा नवा नकाशा प्रकाशित

केंद्रीय गृहमंत्रालयाने देशाचा नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला असून त्यात जम्मू-काश्मीर आणि लेह-लडाख यांना वेगळे दाखवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी

नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर इंडियाच्या कक्षावर एका व्यक्तीने दूरभाष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे.

केरळमध्ये धर्मांध वाहतूक पोलीस कर्मचार्‍याने हिंदु महिला पोलीस अधिकार्‍याला जिवंत जाळले !

केरळमध्ये धर्मांध वाहतूक पोलीस कर्मचार्‍याने हिंदु महिला पोलीस अधिकार्‍याला जिवंत जाळले ! पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.

४ धर्मांधांना फाशी, तर एकाला आजन्म कारावासाची शिक्षा !

एकीकडे ‘आतंकवादाला धर्म नसतो’ आणि दुसरीकडे ‘भगवा आतंकवाद’ अशा प्रकारे आरोळी ठोकणारे तथाकथित पुरोगामी अन् धर्मनिरपेक्षतावादी महाभाग आता गप्प का ? ‘फाशी झालेले सर्व निधर्मी आहेत’, असे हे महाभाग म्हणू लागले, तरी आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही !