‘लष्कर-ए-तोयबा’ आणि ‘जैश-ए-महंमद’ यांचा विस्तार रोखण्यात पाक अयशस्वी ! – अमेरिकेचा अहवाल

पाकिस्तानचा जिहादी चेहरा आता पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे. आतंकवादाचे पोषण करणार्‍या पाकवर जागतिक स्तरावर बहिष्कार घालणे आवश्यक आहे. यासाठी भारतानेच पुढाकार घेऊन आर्थिक, सामाजिक, सामरिक आदी स्तरांवर पाकची कोंडी करून त्याचा खोटारडेपणा अन् कावेबाजपणा जगासमोर आणायला हवा !

तातडीचे साहाय्य म्हणून शेतकर्‍यांना हानीभरपाईसाठी १० सहस्र कोटी रुपयांची तरतूद ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अवेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या हानीचा आढावा : अवेळी पडलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकर्‍यांची नेमकी किती हानी झाली, याची अंतिम आकडेवारी उपलब्ध झाली नसल्याने येत्या २-३ दिवसांमध्ये हानीभरपाईविषयीचा अंतिम निर्णय घेऊन साहाय्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल.

समलैंगिकता आणि व्यभिचार यांना दंडनीय अपराधाच्या कक्षेत आणा ! – सैन्याची मागणी

समलैंगिकता आणि व्यभिचार या पाश्‍चात्त्य विकृती आहेत. भारतीय हिंदु संस्कृतीनुसार या दोन्ही विकृती अनैतिक आणि दंडनीय आहेत. सरकारने सामाजिक दुष्परिणाम जाणून हिंदु परंपरांचे रक्षण करण्यासाठी विशेष कायदा करावा, हीच संस्कृतीप्रेमींची अपेक्षा !

देहलीतील तीस हजारी न्यायालय परिसरात पोलीस आणि अधिवक्ते यांच्यात हिंसाचार

न्यायालयाच्या परिसरातच असा हिंसाचार घडणे, हे कायदा-सुव्यवस्थेला लज्जास्पद ! कायद्याचे रक्षक आणि कायद्याचे तज्ञ यांनी जर एकमेकांच्या विरोधात हिंसाचार केल्यास त्यापुढे सर्वसामान्यांची काय दशा ? कायद्याच्या तज्ञांनी कायदा असा हातात घेणे कितपत योग्य ?

(म्हणे) ‘हाँगकाँगच्या सूत्रावर विदेशी हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही !’ – चीनची चेतावणी

स्वतःच्या अधिपत्याखाली असलेल्या भूभागाविषयी त्याला सोयीस्कर भूमिका घेणारा चीन भारतातील जम्मू-काश्मीरच्या विषयात लुडबुड का करतो ? भारतानेही हाँगकाँगच्या सूत्रावरून चीनला खडे बोल सुनवावेत आणि हाँगकाँगला मुक्त करण्याची मागणी करावी !

सरन्यायाधीश गोगोई यांच्या निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या ८ दिवसांत येणार ६ महत्त्वपूर्ण निकाल !

सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर या दिवशी निवृत्त होत असून त्याआधीच्या कामकाजाच्या ८ दिवसांत त्यांना सुनावणी घेऊन राखून ठेवलेले ६ महत्त्वाच्या प्रकरणांचे निकाल द्यावे लागणार आहेत. अयोध्येतील राममंदिराची उभारणी, शबरीमला मंदिरातील महिलांना प्रवेश, राफेलमधील कथित अपव्यवहार आदी महत्त्वाच्या निकालांचा अंतर्भाव …

भारतातील ‘अयोध्या’ आणि थायलंडमधील ‘अयुद्धया’ दोन्ही देशांच्या संस्कृतीचा संबंध दर्शवते ! – पंतप्रधान मोदी

‘‘थायलंडच्या कणाकणात आपलेपणा जाणवतो. येथील परंपरा आणि श्रद्धा यांमध्ये भारतियत्वाचा गंध आहे. भारतातील ‘अयोध्या’ आणि थायलंडमधील ‘अयुद्धया’ दोन्ही देशांच्या संस्कृतीचा संबंध दर्शवते.

कर्नाटक येथील पू. रामचंद्रय्या बाळगोडू यांनी हिंदु राष्ट्राची स्थापना आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग यांविषयी केलेेले मार्गदर्शन

‘६.९.२०१९ या दिवशी तळवट, कर्नाटक येथील पू. रामचंद्रय्या बाळगोडू यांच्याशी माझी (श्री. राम होनप यांची) भेट झाली. त्यांना प.प. श्रीधरस्वामींनी प्रत्यक्ष अनुग्रह दिला आहे.

केवळ राष्ट्रभावनेनेच नव्हे, तर त्याच्या जोडीला धर्मभावनेने राष्ट्राचे अखंडत्व टिकते !

‘भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील अनेक संस्थाने भारतात विलीन झाली. यामागे संस्थानांची धर्मभावना होती; कारण हिंदु धर्म आणि संस्कृती यांद्वारे त्यांची नाळ भारताशी जोडलेली होती. पुढे भारताला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र घोषित केले गेले.