दिवाळीच्या कालावधीत देशभरात चिनी वस्तूंच्या विक्रीमध्ये तब्बल ६० टक्क्यांनी घट !

अखिल भारतीय व्यापारी संघटनेच्या चीनविरोधी आवाहनाला यश ! भारताला मोठी बाजारपेठ समजून ‘भारत हा चीनवर अवलंबून आहे’, असा समज असणार्‍या नि भारताला गृहीत धरणार्‍या चीनला चपराक ! आता भारतीय जनतेने चिनी वस्तूंवर १०० टक्के बहिष्कार घालून त्याला धडा शिकवावा !

चीननेच जम्मू-काश्मीरच्या काही भागांवर बेकायदा ताबा घेतला आहे ! – परराष्ट्र मंत्रालय

जम्मू-काश्मीरवरून भारताचे चीनला सडेतोड प्रत्युत्तर ! भारताने चीनला खडे बोल सुनावण्यासह ‘अक्साई चीन’वर थेट आक्रमण करून तो कह्यात घ्यावा आणि कुरापतखोर चीनला त्याची जागा दाखवून द्यावी, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

देहली विमानतळावर सापडलेल्या बेवारस बॅगेत स्फोटके असल्याची शक्यता

येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वर ३१ ऑक्टोबरला रात्री १ वाजता एका संशयास्पद बॅगेत सुरक्षायंत्रणांना ‘आरडीएक्स’ स्फोटक मिळाल्याची माहिती आहे.

उत्तरप्रदेशमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी यांच्या हत्येशी कुख्यात गुन्हेगार दाऊद याचा संबंध असण्याची शक्यता

हिंदु समाज पक्षाचे अध्यक्ष आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी यांच्या हत्येशी कुख्यात दाऊद इब्राहिम याचा संबंध असण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या हत्येच्या प्रकरणी सुरक्षा यंत्रणांना एक खास ‘सांकेतिक शब्द’ (कोडवर्ड) मिळाला असून तो दाऊद याच्या ‘डी कंपनी’शी संबंधित आहे.

तमिळनाडूत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची ६ ठिकाणी धाड

‘इस्लामिक स्टेट’शी संबंध असल्याच्या संशयावरून ४ जणांना अटक
देशभरात रुजलेली ‘इस्लामिक स्टेट’ची पाळेमुळे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करून खोदून ती नष्ट करायला हवीत !

प्रवासी हंगामात भरमसाठ दरवाढ करून प्रवाशांची लूट करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करावी !

राज्य परिवहन आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे हिंदु जनजागृती समितीची मागणी : प्रवाशांची म्हणजेच जनतेची होणारी लूट थांबवण्यासाठी शासकीय यंत्रणांनी स्वतःहून कृती करणे अपेक्षित आहे !

सैन्यातील अधिकारी महिला प्रशिक्षणार्थींना पाठवायचा अश्‍लील व्हिडिओ

सैन्याला कठोर प्रशिक्षण देतांना नैतिकतेचेही शिक्षण द्यायला हवे, हेच यातून लक्षात येते !

मनमानी कारभार करणारे पोलीस !

यावल (जळगाव) येथे रमझान मासात गाडी आडवी लावून वाहतूक रोखण्याचा पोलीस निरीक्षक परदेशी यांच्याकडून संतापजनक प्रकार ! पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.

अश्‍लीलता आणि लव्ह जिहाद यांना प्रोत्साहन देणार्‍या ‘बिग बॉस १३’ या कार्यक्रमावर बंदी आणावी !

‘अश्‍लीलता पसववून भारतीय संस्कृतीवर घाला घालणार्‍या आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्‍या ‘कलर्स टीव्ही’ या हिंदी वाहिनीवरील ‘बिग बॉस १३’ कार्यक्रमावर बंदी आणावी या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात विशाखापट्टणम् आणि भाग्यनगर येथे ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ !

विशाखापट्टणम् आणि भाग्यनगर (तेलंगण) या २ ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकत्याच करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलना’त उत्तरप्रदेश येथील हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांच्या निर्घृण हत्येचा निषेध करण्यात आला. यासह विविध मागण्याही करण्यात आल्या.