जम्मू-काश्मीर आणि लडाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून कार्यरत

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे समस्त भारतियांचे स्वप्न साकार झाले आहे. आता सरकारने पाकव्याप्त काश्मीर, अक्साई चीन भारताच्या कह्यात घ्यावा, तसेच देशात समान नागरी कायदा लागू करावा, हीच राष्ट्रप्रेमींची इच्छा !

देहलीमध्ये भाजपचे नेते कपिल मिश्र यांच्या विरोधात गुन्हा नोंद

अल्पसंख्याकांच्या भावना दुखावल्याचे प्रकरण : चित्रपट, नाटके, विज्ञापने इत्यादींच्या माध्यमांतून हिंदूंच्या देवतांचे सर्रासपणे विडंबन केले जाते. याविरोधात पोलिसांत तक्रार करूनही त्याचा काहीच उपयोग होत नाही, असे हिंदूंनी अनेकवेळा अनुभवले आहे; मात्र अल्पसंख्याकांच्या भावना दुखावल्यावर पोलीस तत्परतेने कारवाई करतात !

मुंबई पाण्याखाली जाण्याची शक्यता !

आंतरराष्ट्रीय संशोधनातील निष्कर्ष : सनातनसह अनेक संत आणि भविष्यवेत्ते यांनी यापूर्वीच आगामी आपत्काळात मुंबई पाण्याखाली जाण्याचा धोका असल्याचे भाकित वर्तवले आहे. अध्यात्माने जी घटना अनेक वर्षांपूर्वीच उघड केली होती, तेच आता विज्ञान सांगत आहे. यावरून ‘विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ’ याचा प्रत्यय येतो.

देशाच्या एकतेला आव्हान देणार्‍यांना प्रत्युत्तर देऊ ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिना’चा कार्यक्रम : देशाच्या एकतेला आव्हान देणार्‍यांना प्रत्युत्तर देऊ, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ३१ ऑक्टोबरला येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिना’चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

(म्हणे) ‘भाजपकडे त्यांचा कोणताही स्वातंत्र्यसैनिक किंवा महापुरुष नसल्याने ते सरदार पटेल यांना अभिवादन करत आहेत !’

प्रियांका गांधी-वडेरा यांचे बौद्धिक अज्ञान ! स्वातंत्र्यसैनिक किंवा महापुरुष यांच्यात भेदभाव करणारे काँग्रेसवाले ! जर सर्वच स्वातंत्र्यसैनिक किंवा महापुरुष काँग्रेसी विचारांचे होते, असे मानले, तर त्यांचे भारतात सुराज्य आणण्याचे स्वप्न काँग्रेसवाल्यांनी सर्वाधिक काळ सत्ता भोगूनही पूर्ण का केले नाही ?

राममंदिरासंबंधी येणारा निर्णय खुल्या मनाने स्वीकारा ! – रा.स्व. संघ

येत्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाकडून रामजन्मभूमीत मंदिर उभारण्यासंबंधी निर्णय येण्याची शक्यता आहे. न्यायालयाकडून जो काही निर्णय येईल, तो खुल्या मनाने स्वीकारला पाहिजे.

टिपू सुलतानशी संबंधित लिखाण पाठ्यपुस्तकातून हटवण्यात येणार ! – कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा

क्रूरकर्मा टिपू सुलतानचे लिखाण पाठ्यपुस्तकातून हटवण्याचा निर्णय घेणार्‍या भाजप सरकारचे अभिनंदन ! सरकारने केवळ एवढ्यावरच न थांबता ‘टिपू सुलतान एक्सप्रेस’चेही नाव पालटावे, हीच इतिहासप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांची अपेक्षा !

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या चैतन्यमय वातावरणात झाला पंचमहाभूत याग

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, पंचमहाभूतांच्या प्रकोपांपासून साधकांचे रक्षण व्हावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या आज्ञेने १८ ऑक्टोबर २०१९ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात ‘पंचमहाभूत याग’ करण्यात आला.

म्हादईप्रश्‍नी ‘गोवा फॉरवर्ड’ न्यायालयात जाणार

केंद्रशासनाने म्हादई नदीवर कळसा-भंडुरा प्रकल्प उभारण्यास मान्यता दिल्याच्या विरोधात येथील ‘गोवा फॉरवर्ड’ पक्ष संबंधित न्यायालयात दाद मागणार आहे. न्यायालयात जाण्यासाठी पक्षाच्या कार्यकारी समितीने पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना अधिकार बहाल केले आहेत.