‘#BoycottDabangg3’ हा ‘हॅश टॅग’ ‘राष्ट्रीय ट्रेंड’मध्ये द्वितीय स्थानी

हिंदु साधू आणि देवता यांचा अवमान करणार्‍या ‘दबंग ३’ या चित्रपटाच्या विरोधात धर्मप्रेमी हिंदू ट्विटरवर एकवटले ! हिंदु जनजागृती समितीने चालू केलेल्या या ट्रेंडची इतर प्रसारमाध्यमांनीही नोंद घेतली. ‘#BoycottDabangg3’ हा ट्रेंड काही वेळातच राष्ट्रीय ट्रेंडच्या प्रथम १० मध्ये आला. तसेच तो दुसर्‍या क्रमांकावर २ घंटे कायम राहिला !

…म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शिकायला आणि शिकवायला हवेत !

महाराष्ट्रात जन्माला आलेल्या, ५ पातशाह्यांशी लढून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभिमान जागृत होण्यास प्रारंभ होत आहे.

 देहलीत आपचे मंत्री गौतम यांच्याकडून श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्वीट

आपचा हिंदुद्वेषी इतिहास पाहता त्याच्या मंत्र्याने असे विचार मांडल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! आता मंत्री ‘मी हे ट्वीट केले नाही’, असे म्हणत असतील, तर आप सरकारने याविषयी चौकशी करून सत्य समोर आणावे, तसेच त्यांनी असे म्हटल्याचे समोर आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवणार का, हेही सांगावे !

पोलिसांची गुंडगिरी !

कार्यालयात विलंबाने जेवण पाठवणार्‍या हॉटेलचालकाला पोलीस अधिकारी मीणा यांच्याकडून मारहाण ! पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.

‘अग्रलेखांचा बादशहा’ अशी ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री नीळकंठ खाडिलकर यांचे निधन

‘अग्रलेखांचा बादशहा’ अशी ओळख असलेले ‘दैनिक नवाकाळ’चे माजी संपादक नीळकंठ खाडिलकर यांचे २२ नोव्हेंबर या दिवशी येथील लीलावती रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.

‘अग्नी-२’ क्षेपणास्त्राची रात्रीची चाचणी यशस्वी

येथील ‘अग्नी-२’ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची घेतलेली रात्रीची चाचणी १७ नोव्हेंबरला यशस्वी झाली. हे क्षेपणास्त्र प्रथमच रात्रीच्या वेळी प्रक्षेपित करण्यात आले.

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’च्या कार्यालयांवर सीबीआयच्या धाडी

‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चा अवैध गोष्टींत सहभाग असल्याचे स्पष्ट ! हिंदूंच्या मानवाधिकाराविषयी जाणीवपूर्वक मौन बाळगून केवळ अल्पसंख्याकांवरील कथित अत्याचारांविषयी ऊर बडवणार्‍या या तथाकथित मानवाधिकार संस्थेवर भारतात बंदीच घातली पाहिजे !

आतंकवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची १ ट्रिलियन डॉलरची हानी ! – पंतप्रधान मोदी

विकास, शांतता आणि भरभराट यांना आतंकवादाचा सर्वांत मोठा धोका आहे. आतंकवादामुळे विकसनशील देशांची आर्थिक वृद्धी १.५ टक्क्यांनी न्यून झाली आहे.

‘९/११’ हा दिवस जगभरात प्रभु श्रीरामचंद्रांच्या स्मरणामध्ये ‘अयोध्या दिवस’ म्हणून ओळखला जाईल ! – पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

‘९/११ (९ नोव्हेंबर) हा दिवस आजपासून जगभरात प्रभु श्रीरामचंद्रांच्या स्मरणामध्ये ‘अयोध्या दिवस’ म्हणून ओळखला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे आज आमचे मस्तक अभिमानाने उंचावले आहे.