काश्मीरमध्ये २०० ते ३०० आतंकवादी सक्रीय ! – पोलीस महासंचालक

केवळ अशी माहिती देणारे नव्हे, तर ‘एकही आतंकवादी भारतात घुसणार नाही आणि घुसलेल्या आतंकवाद्यांना ठार केले’, अशी माहिती देणारे पोलीस हवेत !

(म्हणे) ‘भाजप आणि बजरंग दल आय.एस्.आय.साठी हेरगिरी करतात !’ – दिग्विजय सिंह

अशा विधानांमुळे काँग्रेसला मते मिळतील किंवा ती परत सत्तेत येईल, अशी काँग्रेसवाल्यांना अशा वाटत असेल, तर ते मूर्खांच्या राज्यात वावरत आहेत, असेच म्हणावे लागेल !

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग ११ ऑक्टोबरला भारताच्या दौर्‍यावर

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग एका अनौपचारिक संमेलनात सहभागी होण्यासाठी ११ ऑक्टोबरला भारतात येणार आहेत. ते चेन्नई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

दिवाळीमध्ये फटाके फोडू नका ! – केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचे अभिनंदनीय आवाहन

सनातनही गेली अनेक वर्षे या सूत्राविषयी प्रबोधन करत आहे. फटाक्यांमुळे अब्जावधी रुपयांची हानी होण्या समवेतच पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे. वायू आणि ध्वनी प्रदूषण होत आहे. तसेच भारत आर्थिक संकटात असतांना अशी उधळपट्टी योग्य नाही !

पाकने आतंकवादी आणि त्यांच्या संघटना यांवर कठोर कारवाई केली नाही ! – एफ्.ए.टी.एफ्.

पाक कधीही अशी कारवाई करणार नाही, हे सत्य आहे. त्यामुळे त्याच्याकडून अशी अपेक्षा करणेच चुकीचे होते. आता पाकवर कारवाई करून त्याला आतंकवादी देश घोषित करण्याला पर्याय नाही !

पाकने प्रथम आतंकवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई करून शांततेसाठी प्रयत्न करावेत !

तालिबानने नुकत्याच केलेल्या पाकच्या दौर्‍याचा अफगाणिस्तानमधील शांतीप्रक्रियेसाठी कोणताही लाभ होणार नाही. बंडखोरांचे स्वागत करणे, हे नियमांच्या विरोधात आहे.

शासनाकडे मराठी भाषेतून झालेल्या पत्रव्यवहाराला मराठीतूनच प्रत्युत्तर देण्याची सर्व खात्यांना शिफारस करणार ! – गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

सर्व शासकीय खात्यांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य व्हावा आणि मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा, या मागणीला अनुसरून मराठी राजभाषा समितीचे अध्यक्ष गो.रा. ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील समितीच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ७ ऑक्टोबर या दिवशी भेट घेतली.

निष्क्रीय पोलीस !

‘एका खासगी दूरचित्रवाहिनीने रामजन्मभूमी खटल्यातील पक्षकारांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले होते. त्यात पक्षकार हाजी महबूब ६ डिसेंबर १९९२ या दिवशी  कारसेवकांवर बॉम्ब फेकल्याचे मान्य करत असल्याचे समोर आले होते.

उपाहारगृह चालकास धमकी देऊन खंडणी मागणार्‍या काँग्रेसच्या शहर जिल्हा उपाध्यक्षासह ५ जणांना अटक

येथील एका उपाहारगृह चालकास त्याचे अश्‍लील छायाचित्र सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित करण्याची धमकी देऊन काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अय्याज नायकवडी यांच्यासह ४ जणांनी १० लाख रुपयांची खंडणी मागितली.

बांगलादेशमध्ये देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणार्‍या दोघा धर्मांधांना पकडले !

बांगलादेशच्या लालमोनिरहट जिल्ह्यातील अदिथमारी ठाणा येथे २ ऑक्टोबर या दिवशी श्री राधागोविंद मंदिरातील मूर्तींची २ धर्मांधांनी तोडफोड केली.


Multi Language |Offline reading | PDF