दिनविशेष

• आज विजयादशमी
• साईबाबा पुण्यतिथी
• रा.स्व. संघाचा स्थापनादिन
• मध्वाचार्य जयंती

सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली नवरात्रोत्सव मंडपामध्ये अजान

एखाद्या मशिदीत किंवा चर्चमध्ये सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली कधी मंत्रोच्चार आणि मंदिराची प्रतिकृती ठेवण्यात येते का ? आत्मघाती गांधीगिरीमुळे हिंदू सर्वधर्मसमभावाचा ठेका घेऊन स्वतःचीच फसवणूक करून घेत आहेत !

राममंदिर होईल नाही, होणारच ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

होईल म्हणजे, पाऊस पडेल काय ? झाडाला फळ लागेल काय ? अमुक होईल काय ? असे नाही. राम मंदिर होईल नाही, होणारच, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केले.

काश्मीरमधील द्रासमध्ये घुसखोरी करणारे २ आतंकवादी ठार

येथील सिंध खोर्‍यातील गुरेज सेक्टरमध्ये २ आतंकवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतांना सैन्याने केलेल्या कारवाईत ते ठार झाले. गेल्या ६ वर्षांत या भागात प्रथमच घुसखोरीची ही घटना उघडकीस आली आहे.

विजयादशमीच्या दिवशी करावयाच्या कृती आणि त्यामागील शास्त्र !

आश्‍विन शुक्ल पक्ष दशमी या दिवशी येणार्‍या दसरा या सणाच्या शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात.

खरा विजयोत्सव ईश्‍वरी राज्यातच साजरा होईल !

कलियुगात हिंदूंची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. हिंदूंना कुणीही वाली राहिलेला नाही. विजयाचे प्रतीक असणारा दसरा खरोखर साजरा करायचा असेल, तर हिंदूंनी त्यांच्या ऐतिहासिक परंपरेचे पुनर्स्मरण करण्याची वेळ आज आली आहे.

सनातन संस्थेचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना विजयादशमीच्या दिवशी सुचलेल्या काव्यपंक्ती

मिळवूनी विजय स्वभावदोष अन् अहं यांवरी ।
करू स्थापना हिंदु राष्ट्राची सत्वरी ॥

दसरोत्सव !

आज दसरा ! वाईटावर विजय मिळवण्याचा दिवस ! दसरा म्हणजे शौर्य आणि पराक्रम यांना उजाळा देण्याचाही दिवस ! भारतात अनेक शूरवीर आणि पराक्रमी हिंदु राजे होऊन गेले. त्यांनी गाजवलेल्या अपूर्व पराक्रमामुळे भारतभूमीत अनेक विजयोत्सव साजरे केले गेले


Multi Language |Offline reading | PDF