ख्रिस्तीबहुल मेघालयमध्ये एन्.आय.टी.मधील श्री गणेशमूर्ती हटवण्यास विद्यार्थी संघटनेने भाग पाडले !

‘हिंदूबहुल देशात ख्रिस्त्यांच्या श्रद्धास्थानांमुळे धार्मिक तणाव निर्माण होत नाही, तर ख्रिस्तीबहुल राज्यात हिंदूंच्या देवतेच्या मूर्तीमुळे तणाव का आणि कोण निर्माण करत आहे ?’, हे जनतेला कळले पाहिजे ! या घटनेवरून ख्रिस्तीबहुल मेघालयामध्ये हिंदूंची स्थिती कशी आहे, हे लक्षात येते !

भारत-पाक यांच्यात अणूयुद्ध झाल्यास १२ कोटी ५० लाख लोक ठार होतील ! – संशोधकांचा दावा

जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात अणूयुद्ध झाले, तर सुमारे १२ कोटी ५० लाख लोक ठार होतील, तसेच जगात याचा अन्नधान्यांवर परिणाम होऊ शकतो, असे संशोधकांच्या एका अभ्यासातून समोर आले आहे.

बांगलादेशामध्ये रोहिंग्या जिहाद्यांंकडून बौद्ध कुटुंबातील ४ सदस्यांची गळा चिरून हत्या

इस्लामी बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक असुरक्षित ! भारतात घुसलेले बांगलादेशी आणि रोहिंग्या उद्या हिंदूंच्या अशा हत्या करू लागण्यापूर्वी त्यांना भारतातून हाकला !

मी पूर्वी नक्षलवादी होतो आणि मला पुन्हा नक्षलवादी होण्यास भाग पाडू नका !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सरकारी अधिकार्‍यांना चेतावणी : सरकारी अधिकार्‍यांना असे सांगावे लागते, यावरून भारतीय प्रशासनाची दयनीय स्थिती लक्षात येते !

उत्खननातून सापडलेल्या साहित्यावरून तेथे मंदिर असल्याचे सिद्ध होते ! – रामललाचे अधिवक्ता

अयोध्येतील रामजन्मभूमीवरील बाबरी मशिदीच्या खाली एका मोठ्या बांधकामाच्या अस्तित्वाचे पुरावे आहेत. त्याविषयी संशय घेतला जाऊ शकत नाही.

नवरात्रोत्सवात श्री दुर्गादेवीविषयी अश्‍लील भाषेत ‘पोस्ट’ पाठवून हिंदूंच्या भावना दुखावणारे अंनिसचे जिल्हाध्यक्ष जगदीश बद्रे कह्यात

वडसा येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष जगदीश बद्रे यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या एका गटात श्री दुर्गादेवीविषयी अत्यंत अश्‍लील भाषेत ‘पोस्ट’ पाठवून हिंदूंच्या भावना दुखावण्याचा, तसेच समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

गोमूत्र आणि शेण यांद्वारे उत्पादित इंधनाचा रॉकेटसाठी वापर होऊ शकतो ! – एन्.आय.टी.च्या संशोधक प्रा. दुलारी हेंब्रम

असे इंधन बनवण्यासाठी गायींची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असणे आवश्यक आहे. त्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात होणार्‍या गोहत्या थांबणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ करणे धोकादायक !’ – फ्रान्सिस दिब्रिटो

धर्मग्रंथाची शास्त्रीय चिकित्सा झाली पाहिजे. धर्माचा राजकारणासाठी उपयोग चालू झाला की हानी होते. धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ करणे धोकादायक आहे, असे प्रतिपादन नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे घोषित अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले.

निद्रिस्त हिंदूंना जागृत करण्याचा स्तुत्य उपक्रम म्हणजे दुर्गामाता दौड ! – पू. प्राणलिंग महास्वामीजी

स्वत्व, स्व-अभिमान, स्व-अस्तित्व विसरत चाललेल्या निद्रिस्त हिंदूंना पुन्हा जागृत करण्याचा स्तुत्य उपक्रम म्हणजे दुर्गामाता दौड होय, असे मार्गदर्शन पू. प्राणलिंग महास्वामीजी यांनी केले. श्रीराम सेना यांच्या वतीने आयोजित श्री दुर्गामाता दौडीच्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.


Multi Language |Offline reading | PDF