हिंदूंना घाबरवण्यासाठीच पाकच्या सिंधमध्ये दंगल घडवून हिंसाचार ! – सरकारी चौकशी समितीचा अहवाल

जगासमोर ‘काश्मीरमध्ये अत्याचार होत आहे, नरसंहार होत आहे’, असे ओरडून खोटे बोलणार्‍या पाकमध्ये अल्पसंख्याकांची काय स्थिती आहे, हे सरकारचीच समिती सांगत आहे ! ‘काश्मीरमधील स्थिती पाहून जगातील एखादा मुसलमान हातात बंदूक घेईल’, असे म्हणणारे इम्रान खान याविषयी का बोलत नाहीत ?

फुटीरतावाद्यांना हाफीज सईद याच्याकडून आतंकवादी कारवायांसाठी पैसे मिळत होते ! – एन्.आय.ए.च्या चौकशीत उघड

या फुटीरतावाद्यांवर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती; मात्र देशावर सर्वाधिक काळ सत्ता गाजवणार्‍या काँग्रेस सरकारने केले नाही, हे जाणा !

जर सीमारेषा पार करावी लागली, तर तीही करू ! – सैन्यदलप्रमुख बिपीन रावत

भारतीय सैन्य पराक्रम गाजवण्यासाठी केव्हाही सिद्ध आहे. सीमेपार जाऊन ते गाजवण्याची त्याला भारत सरकारने मुभा द्यावी, असेच भारतियांना वाटत आहे !

(म्हणे) ‘काश्मिरी हिंदूंचे दुःख हिंदुत्वनिष्ठांना मिळालेले शस्त्र !’ – मेहबूबा मुफ्ती

‘काश्मीरमधील मुसलमानांवरील कथित अत्याचार हे इम्रान खान, फुटीरतावादी, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, पाकप्रेमी यांना मिळालेले शस्त्र आहे’, असे म्हणायचे का ?

भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीची संयुक्त पत्रकाद्वारे घोषणा !

विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि मित्रपक्ष यांच्या साहाय्याने महायुती करण्यात येणार आहे, अशी घोषणा भाजपचे नेते आणि महसूलमंत्री श्री. चंद्रकांत पाटील अन् उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते श्री. सुभाष देसाई यांनी एका संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

रामलला विराजमानकडून मध्यस्थी करण्यास नकार

रामजन्मभूमी ही लाखो वर्षांपासून अस्तित्वात आहे. त्यामुळे जेमतेम सहस्र वर्षांपूर्वी या भारतभूमीवर पाऊल ठेवणार्‍या मुसलमानांच्या वंशजांनी लाखो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या हिंदूंच्या भूमीवर स्वतःचा दावा सांगणे हास्यास्पद !

समस्त मानवजातीच्या रक्षणासाठी गोमातेचे रक्षण करणे आपले दायित्व ! – प.पू. देवबाबा, किन्नीगोळी, कर्नाटक

गोमाता (ही केवळ भौतिकच नव्हे) तर आपली आध्यात्मिक उन्नतीही करवून देते. यामुळे पृथ्वीवर तिचे अस्तित्व वाढवले पाहिजे. हीसुद्धा साधनाच आहे.

वर्ष २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट खटला त्वरित निकाली काढावा !

वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्याला २८ सप्टेंबर २०१९ या दिवशी ११ वर्षे पूर्ण झाली. खटल्यात बळी पडलेले आणि निर्दोष भारतीय नागरिक हे अद्यापही न्यायापासून पूर्णतः वंचित आहेत.

सीबीआय देव नाही की, तिच्याकडून प्रत्येक घटनेचे अन्वेषण करण्यात यावे ! – सर्वोच्च न्यायालय

सीबीआय देव नाही की, तिला प्रत्येक घटना समजू शकेल आणि प्रत्येक घटनेची चौकशी करून ती सोडवू शकेल ! सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, प्रत्येक घटनेचे अन्वेषण सीबीआय करू शकत नाही. जर असे झाले, तर अराजक होईल. असे केले जाऊ शकत नाही.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी बनावट आधारकार्डचा वापर केला जात असल्याचे उघड

असा खोटेपणा करणार्‍यांवर श्री विठ्ठलाची कृपा कधीतरी होईल का ? धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच अशा अयोग्य कृती केल्या जातात, हेच यातून लक्षात येते ! यासाठी शासनाने समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे !


Multi Language |Offline reading | PDF