तेलंगणमधील प्रसिद्ध लक्ष्मी नरसिंह मंदिरात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे चित्र कोरले !

मतांसाठी अल्पसंख्याकांवर सुविधांची खैरात करणारे आणि हिंदूंकडे दुर्लक्ष करणारे मुख्यमंत्री राव यांचे मंदिरात चित्र कोरणारे देवस्थान मंडळ धर्मद्रोहीच होय !

पैसे घेऊन दंगल घडवून आणत असल्याच्या आरोपातून श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांची निर्दोष मुक्तता !

‘तेहलका’च्या कथित ‘स्टिंग ऑपरेशन’चे प्रकरण : हिंदुत्वनिष्ठांवर चिखलफेक करण्याची ‘तेहलका’ची ही काही पहिलीच वेळ नव्हे. अशा प्रकारे खोटे ‘स्टिंग ऑपरेशन’ करून हिंदूंच्या संघटना आणि त्यांचे प्रमुख यांची अपकीर्ती करणार्‍या संबंधितांना कारागृहात टाकले पाहिजे !

‘विक्रम’ लँडर चंद्रावर सुस्थितीत असून इस्रोकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न

चंद्रयान-२ मोहिमेतील लँडर विक्रम याचे चंद्रावर ‘हार्ड लँडिंग’ (चंद्रावर योग्य आणि नियोजनानुसार न झालेले ‘लँडिंग’) झाले आहे; मात्र त्याची कोणतीही हानी झालेली नाही.

पाकिस्तानने मसूद अझहरला गुपचूप कारागृहातून सोडले !

भारतात आतंकवादी कारवाया करण्याचा कट रचण्याचा प्रयत्न : अशा पाकचा निःपात अपरिहार्य !

आत्मा अमर आहे ! – विदेशी शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा निष्कर्ष

जे भारतीय हिंदु संस्कृतीने लक्षावधी वर्षांपूर्वी सांगितलेे आहे, ते आता शास्त्रज्ञ सांगत आहेत ! तरीही भारतातील नतद्रष्ट बुद्धीप्रामाण्यवादी यावर विश्‍वास ठेवणार नाहीत !

‘मवाळ हिंदुत्व’ अंगीकारल्यास काँग्रेस संपेल ! – काँग्रेस नेते शशी थरूर

काँग्रेसने हिंदुत्व अंगीकारले, तरी तिचा खरा तोंडवळा लोकांना ठाऊक आहे आणि तिने आतापर्यंत केलेले पाप पहाता तिचे अस्तित्व नष्ट होणेच अपेक्षित आहे !

इराणमधील पाकच्या दूतावासाकडून भारतविरोधी लावलेली भित्तीपत्रके इराणने हटवली !

इराणच्या मशहद या शहरातील पाकच्या दूतावासाच्या भिंतींवर लावण्यात आलेली भारतविरोधी भित्तीपत्रके काढण्यात आली आहेत.

स्विस बँकांमधील भारतियांच्या खात्यांची सूची भारताला सादर

स्वित्झर्लंड सरकारने स्विस बँकांमध्ये भारतियांच्या असलेल्या खात्यांची सूची भारताला सादर केली आहे. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात झालेल्या करारानंतर ही माहिती देण्यात आली आहे.

जगातील सर्व शास्त्रांची जन्मभूमी हिंदुस्थान आहे ! – पू. भिडेगुरुजी

आपल्या देशात पुष्कळ साधनसंपत्तीसह बुद्धीसंपत्तीही अलोट आहे. अमेरिकेच्या संशोधन मंडळातील ११ जणांतील ९ सदस्य हे हिंदुस्थानचे आहेत.


Multi Language |Offline reading | PDF