लंडन येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर १० सहस्र पाक समर्थकांचे आक्रमण

लंडनमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाक समर्थक एकत्र येतात आणि भारतीय उच्चायुक्त कार्यालयावर आक्रमण करतात, हे जगात गौरवण्यात आलेल्या ब्रिटीश पोलिसांना लज्जास्पद ! लंडनचे महापौर सादिक खान हे पाक वंशाचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पाकसमर्थकांवर कारवाई होईल, अशी आशाच नको !

हुपरी येथील शासकीय जागेवरील मुस्लिम सुन्नत जमीयतच्या अवैध अतिक्रमणावर उचित कारवाई करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कोल्हापूर आणि हुपरी येथे निवेदन

अशी मागणी का करावी लागते ?
नेहमी कायद्यावर बोट दाखवून हिंदूंची मंदिरे पाडण्यास पुढे असणारे प्रशासन मुसलमानांच्या संघटनांसमोर गुडघे टेकते, हे लक्षात घ्या !

लैंगिक दृष्यांमधून गुरु-शिष्य परंपरेची अपर्कीती करण्याचा ‘नेटफ्लिक्स वेबसिरीज’चा प्रयत्न

शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश सोलंकी यांची पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘खलनायक’ संबोधणार्‍या ‘एबीपी माझा’ला ज्याप्रमाणे हिंदूंनी संघटित होऊन ताळ्यावर आणले, त्याच प्रमाणे ‘नेटफ्लिक्स’ला हिंदूंनी त्याची जागा दाखवावी ! यासाठी परिणामकारक संघटन आवश्यक आहे !

पाकिस्तान जगातील सर्वांत धोकादायक देश ! – अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस

भारतातील पाकप्रेमींच्या डोळ्यांत अंजन घालणारे विधान ! असा धोकादायक शेजारी भारताला मिळाल्यावर भारताने किती सतर्क रहायला हवे, हे लक्षात येते ! पाकला ‘धोकादायक’ बनवण्यामागे अमेरिकेचाही हात आहे, हे येथे लक्षात घ्यायला हवे ! पाक आतंकवाद पोसतो, हे ज्ञात असतांनाही अमेरिकेने त्याला भरभरून आर्थिक साहाय्य केले !

मसूद अझहर, हाफीज सईद, दाऊद इब्राहिम आणि लखवी भारताकडून आतंकवादी घोषित

भारताने नव्या ‘आतंकवाद विरोधी कायद्या’च्या (अनलॉफुल अ‍ॅक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन अ‍ॅक्ट) अंतर्गत आतंकवादी घोषित केले आहे. या सर्वांच्या विरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीसही जारी करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘देवतेची मूर्ती ठेवल्याने मशिदीचे अस्तित्व नष्ट होत नाही !’ – सुन्नी वक्फ बोर्डाच्या अधिवक्त्यांचा युक्तीवाद

रामजन्मभूमी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील नियमित सुनावणी : अयोध्येतील राममंदिरासह हिंदूंची लक्षावधी मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधण्यात आल्या आहेत. मशिदींचे अस्तित्वच खोटे असल्यामुळे तेथे पूर्वी मंदिरे होती हेच सत्य आहे ! मंदिरांच्या जागांवर मशिदी उभारल्यामुळे मंदिरांचा इतिहास नष्ट होत नाही !

टेनेसी (अमेरिका) येथील कॅथॉलिक शाळेमधून हॅरी पॉटरची पुस्तके हटवली

ख्रिस्ती धर्मगुरु वाईट शक्तींचे अस्तित्व मानतात. त्यांच्या विरोधात मात्र बुद्धीप्रामाण्यवादी चकार शब्दही काढत नाहीत. अशी कृती जर हिंदु संतांनी अथवा धर्मगुुरूंनी केली असती, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असती !

विसर्जनासाठी अशास्त्रीय पर्यायांचा वापर टाळण्यासंदर्भात चिंचवड येथे निवेदन

गेल्या काही वर्षांपासून श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद किंवा अमोनियम बायकार्बोनेट यांसारख्या अशास्त्रीय पर्यायांचा प्रसार करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लोकप्रतिनिधी, तसेच महापालिका प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF