आज श्री गणेशचतुर्थी

आज श्री गणेशचतुर्थी : वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आणि वितरक यांच्यावर श्री गणेशाची अखंड कृपादृष्टी राहो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना !

जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत प्रश्‍न !

पाक सैन्य आणि सरकार यांच्यावर कधीही विश्‍वास ठेवू नये. हे दोघेही काश्मीरच्या लोकांची गेल्या ७२ वर्षांपासून फसवणूक करत आहेत, अशी टीका पाकमधील मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट (एम्क्यूएम्)चे संस्थापक अल्ताफ हुसेन यांनी लंडन येथून केली.

हिंदुद्वेषी हिंदुस्थान युनिलिवरने रेड लेबल चहाच्या विज्ञापनाद्वारे मुसलमानांना धर्मनिरपेक्ष आणि हिंदूंना कट्टर दाखवले !

हिंदुस्थान युनिलिवरकडून सातत्याने हिंदूंना धर्मनिरपेक्षेतेचे डोस पाजण्याचा प्रयत्न केला जाणे, हे संतापजनक आहे ! वास्तविक हिंदू हे धर्मांध असते, तर भारतात अन्य पंथीयांचे अस्तित्व टिकून राहिले असते का ? विज्ञापनांद्वारे सातत्याने हिंदूंना हीन लेखणार्‍या अशा आस्थापनांना त्यांची जागा दाखवण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन अपरिहार्य !

(म्हणे) भाजप आणि बजरंग दल यांना आयएस्आयकडून पैसे मिळतात ! – काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा आरोप

मुसलमानांपेक्षा मुसलमानेतर लोकच पाकची गुप्तचर संघटना आयएस्आयसाठी हेरगिरी करतात. भाजप आणि बजरंग दल हे आयएस्आयकडून पैसे घेतात, याकडे थोडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

श्री गणेशमूर्ती विसर्जनस्थळी मूर्ती आणि निर्माल्य हिसकावून घेणार्‍यांवर कारवाई व्हावी !

गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये दीड दिवसानंतर, तसेच गौरीविसर्जन, अनंत चतुर्दशी आदी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी काही स्वयंसेवक भाविकांच्या हातातून मूर्ती आणि निर्माल्य बलपूर्वक हिसकावून घेण्याचे प्रकार सर्रासपणे घडतात.

मुंबईतही राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या प्रक्रियेस प्रारंभ करा ! – अरविंद सावंत, केंद्रीय मंत्री

आसामच्या धर्तीवर मुंबईत राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या (एनआरसीच्या) प्रक्रियेस प्रारंभ करावा, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत ३० ऑगस्टला केली. केवळ मुंबईतच नव्हे, तर पूर्ण भारतात ही प्रक्रिया राबवणे आवश्यक !

मोदीजी आणि शहाजी, तुमच्या हातात देशाचेसुरक्षित भविष्य आहे; म्हणून तुम्ही स्वत:ला जपायला हवे !

काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांच्या मृत्यूमागे विरोधकांच्या मारक शक्तीचा प्रयोग कारणीभूत !, असे विधान भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी केले होते. अलीकडेच भाजपच्या नेत्यांच्या मृत्यूच्या मालिकेत पुढचा क्रमांक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असेल

मागील ५ वर्षांत मुंबईतील भ्रष्टाचार २४ टक्क्यांनी न्यून ! – प्रजा फाऊंडेशन

मागील ५ वर्षांत मुंबईतील भ्रष्टाचार ३८ वरून १४ टक्क्यांवर आला आहे, असे मत प्रजा फाऊंडेशनकडून व्यक्त करण्यात आले आहे. मतदारसंघनिहाय घेतलेल्या सर्वेक्षणावरून प्रजा फाऊंडेशनने हा निष्कर्ष काढला आहे.


Multi Language |Offline reading | PDF