नवरात्रोत्सव (आज दुसरा दिवस)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

गरबा आणि दांडिया कार्यक्रमांत अहिंदूंचा प्रवेश रोखण्यासाठी आधारकार्ड आवश्यक ! – बजरंग दलाचे आवाहन

आता तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली बजरंग दलाला विरोध करतील अन् प्रसारमाध्यमे त्याला वारेमाप प्रसिद्धी देतील ! केवळ आधारकार्डच नव्हे, तर टिळा लावणे, देवीचा श्‍लोक म्हणणे, आरती करणे, जयघोष करणे आदीही अनिवार्य केले पाहिजे !

(म्हणे) ‘भाजप आणि संघ यांचे लोक ‘गोडसे मुर्दाबाद’ म्हणतील, तेव्हा मी त्यांना खरे गांधीवादी समजेन !’ – छत्तीसगडचे काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल

काँग्रेसवाले जेव्हा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर झिंदाबाद’ अशा घोषणा देतील, तेव्हाच हिंदू समजतील की, काँग्रेस देशभक्त आहे आणि ती खर्‍या अर्थाने क्रांतीकारकांचा सन्मान करते !

(म्हणे) ‘भारताने आक्रमण करून काश्मीरवर नियंत्रण मिळवले !’- मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथिर महंमद

इस्लामी देश मलेशियाने याआधीच जिहादी आतंकवाद्यांना मार्गदर्शन करणारा झाकीर नाईक याला भारताकडे सोपवण्यास विरोध केला आहे. आता काश्मीरविषयी विधान करून त्याने ‘तो पाकचा जुळा भाऊ आहे’, हेच दर्शवले आहे. मलेशियामध्ये पर्यटनासाठी जाणार्‍या हिंदूंनी त्याच्यावर बहिष्कार घातला पाहिजे !

‘अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ’वरील ‘द फॅमिली मॅन’ मालिकेला रा.स्व. संघाचा विरोध

मालिकेमध्ये हिंदूंविषयी चुकीची माहिती प्रसारित
अशा प्रकारच्या वेबसिरीजमधून भारत, हिंदू आणि हिंदूंच्या संघटना यांचा होणारा अवमान रोखण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलणे आवश्यक आहे !

देशाचा इतिहास नव्याने लिहिण्याची वेळ आली आहे ! – गृहमंत्री अमित शहा

काँग्रेस आणि साम्यवादी यांनी लिहिलेला इतिहास हिंदुविरोधी आहे. तो पालटून हिंदूंचा पराक्रम, संस्कृती, कला आदींचा जाज्वल्य इतिहास लिहिला पाहिजे. याला कोणीही ‘इतिहासाचे भगवेकरण’ म्हटले, तरी त्याला भीक घालू नये; कारण हाच सत्य इतिहास आहे !

अनेक वर्षे झोपल्यानंतर जागे झालेले पोलीस !

वाहतूक पोलिसांनी शिरस्त्राण (हेल्मेट) न घालणार्‍या ४३, तर सीट बेल्ट न लावता वाहन चालवणार्‍या १२ पोलीस वाहनचालकांविरुद्ध दंडाची कारवाई केली.

भारतमातेचा संसार चालवण्यासाठी श्री दुर्गामातेजवळ शक्ती मागूया ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामध्ये स्वराज्य, स्वधर्म यांच्यासाठी कृती करण्याचे विलक्षण कर्तृत्व आहे.

सौदी अरेबियाने विदेशी पर्यटक महिलांवरील बुरखा घालण्याची सक्ती हटवली

सौदी अरेबियाने जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने विदेशी पर्यटक महिलांवरील बुरखा घालण्याची सक्ती हटवली आहे. सौदीच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना आर्कषित करण्यासाठी सौदी अरेबियाने हा निर्णय घेतला आहे.

जगात इंग्रजी इतकी निरर्थक आणि अवैज्ञानिक भाषा कोणतीच नाही ! – राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष भगवानलाल साहनी

जगात इंग्रजी इतकी निरर्थक आणि अवैज्ञानिक भाषा कोणतीच नाही, असे विधान राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे (एन्.सी.बी.सी.चे) अध्यक्ष भगवानलाल साहनी यांनी येथे एका कार्यक्रमात केले.


Multi Language |Offline reading | PDF