(म्हणे) ‘अभिनेते शाहरूख खान यांनी भारतव्याप्त काश्मीरमधील अत्याचारांवर बोलायला हवे !’ – पाक सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर

राष्ट्रप्रेमींनो, सावधान ! पाककडून आता भारतातील मुसलमानांना चिथवण्याचा प्रयत्न ! शाहरूख खान यांना काही बोलायचे असेल, तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांवर होणार्‍या अत्याचारांवर बोलायला हवे !

(म्हणे) ‘राष्ट्रवादाच्या नावाखाली लाखो काश्मिरींचा आवाज दाबला जात आहे ! – प्रियांका वाड्रा

राष्ट्रवादाच्या नावावर काँग्रेसने त्याच्या सत्ताकाळात जनतेवर, विशेषतः हिंदूंवर अत्याचार केले, त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना आतंकवादी ठरवले, काश्मीरमधील हिंदूंचे पलायन आणि वंशविच्छेद होत असतांना काँग्रेस निष्क्रीय राहिली, याविषयी प्रियांका वाड्रा का बोलत नाहीत ?

जम्मू-काश्मीरमध्ये मूलभूत अधिकारांची गळचेपी होत असल्याचा कांगावा करत केरळच्या आय.ए.एस्. अधिकार्‍याचे त्यागपत्र

अन्यायाविरोधात चीड असणे आवश्यक आहेच; मात्र त्याला ढोंगी धर्मनिरपेक्षतावादाचा चष्मा नको. मात्र कलम ३७० रहित केल्यावर खबरदारीचा उपाय म्हणून ठेवलेल्या बंदोबस्तामुळे कोणाच्या अधिकाराची गळपेची होत आहे, असे म्हणणे हा शुद्ध कांगावा आहे !

राममंदिर उभारण्यासाठी सर्व परिस्थिती अनुकूल ! – महंत नृत्य गोपाल दास

राममंदिर उभारणे हा श्रद्धेचा विषय आहे आणि तो कोणीही कोट्यवधी भारतियांकडून हिरावून घेऊ शकत नाही. अयोध्येमध्ये राममंदिर उभारण्यासाठी सध्याची सर्व परिस्थिती अनुकूल आहे, असे प्रतिपादन श्री रामजन्मभूमी न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी केले आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी धर्मांधांकडून शोभायात्रेवर दगडफेक

धर्मांधांकडून हिंदूंच्या धार्मिक यात्रांवर होणारी आक्रमणे सहिष्णुतावादी पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि प्रसारमाध्यमे यांना दिसत नाहीत का ?

अरुण जेटली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या पार्थिवावर २५ ऑगस्ट या दिवशी शासकीय इतमामात येथील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्यासमवेत भगवा ध्वजही लावणार ! – अजित पवार यांची घोषणा

अस्तित्वात नसलेल्या ‘हिंदु आतंकवादा’च्या नावाने राळ उठवणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचारासाठी भगव्याचा आधार घ्यावा लागणे, हा त्यांना काळाने शिकवलेला धडाच म्हणावा लागेल !

भारताने पाकव्याप्त काश्मीर कह्यात घ्यावा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

वर्ष १९४७ मध्ये नेहरू यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये जम्मू-काश्मीरचा प्रश्‍न नेऊन ठेवला. आता पंतप्रधान मोदी यांनी तो तेथून मागे घेतला पाहिजे.

अधिकोषातील खात्यातून पैसे वटवणारी टोळी अटकेत

उपाहारगृहातील वेटर आणि पेट्रोलपंपावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना हाताशी धरून ग्राहकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचे ‘क्लोनिंग’ करीत अधिकोषातील खात्यातून पैसे वटवणारे मोहंमद आरिफ खत्री, केशव मगता पात्रो  यांना पोलिसांनी अटक केली आहे.

(म्हणे) ‘श्री गणेशमूर्ती हौदात किंवा अमोनियम बायकार्बोनेटच्या मिश्रणात विसर्जित करा !’

‘पर्यावरणपूरक’तेच्या नावाखाली पुणे महापालिकेचे धर्मशास्त्रविसंगत आवाहन


Multi Language |Offline reading | PDF