सनातन संस्थेच्या वतीने वृंदावन येथील हनुमान कथा वाचक श्री. अनुराग पाठक यांची सदिच्छा भेट

या भेटीत श्री. पाठक यांनी सनातनचे कार्य आत्मीयतेने जाणून घेतले आणि या कार्यात सर्वातोपरी साहाय्य करणार असल्याचे सांगितले.

‘एफ्एटीएफ्’ने पाकला काळ्या सूचीमध्ये टाकले

आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याचे कारण : आतंकवाद्यांना होणार्‍या अर्थपुरवठ्यावर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संस्था ‘फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या (‘एफ्एटीएफ्’च्या) ‘एशिया पॅसिफिक ग्रुप’च्या गटाने पाकिस्तानला काळ्या सूचीमध्ये टाकले आहे.

काश्मीरप्रश्‍न द्विपक्षीय चर्चेतून सोडवा ! – फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्यूल मॅक्रॉ

काश्मीरप्रश्‍न भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चेतूनच सुटला पाहिजे. या भागात कुठल्याही तिसर्‍या देशाने हस्तक्षेप करता कामा नये, तसेच हिंसाचार होईल, अशी पावले उचलता कामा नयेत, असे विधान फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्यूल मॅक्रॉ यांनी केले आहे.

भारताला अण्वस्त्र आक्रमणाची धमकी देणार्‍या पाकच्या मंत्र्याला लंडनमध्ये अज्ञातांनी चोपले !

पाकच्या मंत्र्यांना चोपायला अण्वस्त्रांची आणि भारतीय सैन्याचीही आवश्यकता नाही, हे पाकिस्तान्यांच्या आता लक्षात आले असेल !

अमेरिका, ब्रिटन आदी देशांनी चीन आणि पाक यांना फटकारले

येथे संयुक्त राष्ट्रांमध्ये झालेल्या धार्मिक अल्पसंख्यकांच्या सुरक्षेविषयीच्या चर्चेमध्ये अमेरिका, ब्रिटन आदी देशांनी चीन आणि पाकिस्तान या देशांमध्ये अल्पसंख्यकांवर होत असलेल्या भेदभावावरून टीका केली.

‘द झोया फॅक्टर’ या चित्रपटाच्या भित्तीपत्रकावर अभिनेत्री सोनम कपूर यांना श्री महालक्ष्मीदेवीच्या रूपात दाखवले !

हातात ‘हेल्मेट’ आणि ‘बॅट’ दाखवून देवीचे विडंबन : असा अवमान करणार्‍यांवर प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई होत नसल्यामुळे असे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे आता हिंदूंनीच संघटित होऊन अशा चित्रपटांवर बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

घोटाळेबाज चिदंबरम् यांच्या कुटुंबियांकडे १७५ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती

अशा घोटाळेबाजांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केेले पाहिजेत !

सोलापूरसह जिल्ह्यातील शाळांमध्ये सत्यनारायण पूजा आणि धार्मिक कार्यक्रम यांवर बंदी

शिक्षणाधिकार्‍यांचा जिल्ह्यातील शाळांना पत्रकाद्वारे आदेश
हिंदूबहुल महाराष्ट्रात शाळेतील सत्यनारायण पूजेसारख्या धार्मिक विधीवर बंदी घातली जाणे संतापजनक ! शाळांमध्ये पूजा केल्याने धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण झाल्याचे एक तरी प्रकरण ऐकिवात आहे का ?


Multi Language |Offline reading | PDF