पी. चिदंबरम् यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी

भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालणारी काँग्रेस ! काँग्रेसचे पी. चिदंबरम् गृहमंत्री होते, त्या वेळी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित आदींना आतंकवादी ठरवून त्यांना अटक करून ९ वर्षे कारगृहात ठेवण्यात आले, तेव्हा ती हिंदुद्वेषातून केलेली कारवाई होती, हे हिंदू विसरलेले नाहीत ! हिंदूंना आतंकवादी ठरवणारे भ्रष्टाचारी काँग्रेसवाले म्हणे निष्पाप आणि निरपराधी !

अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक स्टेटच्या विरोधातील युद्धामध्ये भारतासह अन्य देशांनी सहभागी व्हावे ! – डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन

भारतातील आतंकवादाच्या विरोधात अमेरिकेने भारताला किती साहाय्य केले ? पाकला सातत्याने देण्यात येत असलेल्या आर्थिक आणि सैन्य साहाय्यातून पाक त्याचा वापर भारताच्या विरोधात करत असतांना अमेरिकेने त्याला का रोखले नाही ?

देहली विश्‍वविद्यालयात काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्या विद्यार्थी संघटनांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देशद्रोही ठरवून त्यांच्या पुतळ्याला काळे फासले

अशा देशद्रोही विद्यार्थी संघटनांवर केंद्र सरकारने बंदी घातली पाहिजे आणि संबंधितांना कारागृहात डांबले पाहिजे ! काँग्रेस आणि कम्युनिस्ट हेच पक्ष मुळात राष्ट्रघातकी आहेत. अशांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देशद्रोही ठरवणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’च होत !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

काँग्रेसच्या एन्.एस्.यु.आय. या विद्यार्थी संघटनेच्या देशद्रोह्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून काळे फासले ! हा अपमान केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा नव्हे, तर संपूर्ण देशाचा; संपूर्ण क्रांतीकारकांच्या चळवळीचा; समस्त देशप्रेमी नागरिकांचा आहे. ‘हा अक्षम्य अपराध करणारे हे देशद्रोहीच आहेत.’

उत्तरप्रदेशमध्ये ‘डीजे’ वाजवण्यावर न्यायालयाकडून बंदी

बंदीचे उल्लंघन करणार्‍यांना ५ वर्षे कारावास होणार
पोलीस या बंदीचे काटेकोर पालन करतील; मात्र मशिदींवरील अवैधरित्या लावण्यात येणार्‍या भोंग्यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणार नाहीत !

‘चर्च ऑफ साऊथ इंडिया’ने संरक्षण मंत्रालयाची भूमी ६० कोटी रुपयांना विकली

चर्चच्या विरोधात फसवणुकीचा खटला प्रविष्ट
एकीकडे मंदिरांचे सरकारीकरण होत असतांना दुसरीकडे चर्च सरकारचीच फसवणूक करत असूनही त्याचे सरकारीकरण होत नाही, हे लक्षात घ्या !

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा नोंद करण्याचा न्यायालयाचा आदेश

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे प्रकरण – काँग्रेस सरकारची सत्ता होती, त्या वेळी भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालण्याचाच प्रकार झाल्यामुळे सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळला ! आतातरी सरकारने भ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई करून भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी पाऊल उचलावे !

मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथे ‘रामनाम संकीर्तन अभियाना’च्या माध्यमातून ‘ईश्‍वरी राज्या’च्या स्थापनेसाठी श्रीरामनामाचा उत्स्फूर्त उद्घोष !

रामराज्यासम ईश्‍वरी राज्याची स्थापना व्हावी, यासाठी मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथील मंदिरे, सनातन संस्थेचे साधक, सनातन प्रभात नियतकालिकांचे वाचक, धर्मप्रेमी आदींच्या घरी रामनाम संकीर्तन अभियान राबवण्यात आले.

(म्हणे) ‘काश्मीरवरून भारत-पाक यांच्यातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न करीन !’ डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा मध्यस्थीचा प्रस्ताव

काश्मीरमध्ये स्फोटक आणि जटील परिस्थिती आहे. तेथे हिंदु आणि मुसलमान दोघेही आहेत. त्यांच्यामध्ये फार सख्य आहे, असे मी म्हणणार नाही. भारत-पाक यांच्यामध्ये बर्‍याच समस्या आहेत. काश्मीरवरून दोन्ही देशांमध्ये तणाव न्यून व्हावा यासाठी शक्य असेल, ते सर्व मी करीन


Multi Language |Offline reading | PDF