ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यातील मागासवर्गियांचीही नेमणूक होणार

आंध्रप्रदेशात मंदिर व्यवस्थापनातील ५० टक्के जागा मागासवर्गियांसाठी राखीव : राज्याचे मुख्यमंत्री ख्रिस्ती असल्यावर आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, त्या वेळीही असेच झालेले असतांना आताही याहून वेगळे काय होणार ? हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी याचा वैध मार्गाने विरोध केला पाहिजे आणि केंद्रातील भाजप सरकारनेही याची नोंद घेऊन याचा विरोध केला पाहिजे !

(म्हणे) ‘संधी मिळताच अणूबॉम्ब टाकून भारताला नष्ट करू !’ – पाकचे माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद

जावेद मियांदाद हे जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याचे व्याही आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरल्यास आश्‍चर्य ते काय ? अशा जिहादी आणि धर्मांध मनोवृत्तीच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या पाकच्या क्रिकेट संघाशी भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेटचे सामने खेळले होते, यासारखी संतापजनक गोष्ट ती कोणती ?

२०० माजी खासदारांना सरकारी बंगले रिकामी करण्याच्या नोटिसा

नियमांचे उल्लंघन करून अधिक काळ सरकारी बंगल्यांमध्ये वास्तव्य करणार्‍या माजी खासदारांना यापुढे देशातील कोणतीही निवडणूक लढवण्यावरच बंदी घातली पाहिजे ! एक मास झाल्यानंतर नोटीस पाठवण्याऐवजी थेट पोलीस कारवाई करून त्यांना घरातून बाहेर काढायला हवे !

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी अंनिसच्या ट्रस्टमधील आर्थिक घोटाळ्यांची चौकशी का नाही ? – हिंदु जनजागृती समिती

२० ऑगस्ट २०१३ या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिसचे) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर ‘डॉ. दाभोलकर कसे महान समाजसेवक होते’, हे दर्शवण्यासाठी अंनिसवाले जिवाचे रान करत आहेत.

२ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी एन्आयएच्या ३ अधिकार्‍यांचे स्थानांतर

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) ३ अधिकार्‍यांनी २ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी त्यांचे स्थानांतर करण्यात आले आहे.

भगवान श्रीरामाचे प्राचीन मंदिर पाडून तेथे बाबरी मशीद बांधण्यात आली ! – ‘रामलला विराजमान’चे अधिवक्ता

रामजन्मभूमीवर मशीद बांधण्यात आली होती. तेथे पूर्वी भगवान श्रीरामाचे भव्य प्राचीन मंदिर होते. पुरातत्व विभागाने येथे केलेल्या उत्खननामध्ये ज्या वस्तू सापडल्या त्यातून हे स्पष्ट झाले आहे

बेंगळुरू शहरात प्लास्टर ऑफ पॅरीसऐवजी शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींना प्राधान्य

आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य मिळण्यासाठी मूर्तीकारांना साहाय्य करणारी योजना बनवावी आणि पर्यावरणाचे रक्षण करावे !

गोहत्याबंदी विधेयक संमत होईपर्यंत जमावाकडून होणार्‍या हत्या थांबवता येणार नाहीत ! – आमदार टी. राजासिंह

जोपर्यंत गोहत्याबंदी विधेयक संमत होत नाही, तोपर्यंत जमावाकडून होणार्‍या हत्या रोखता येणार नाहीत, असे विधान तेलंगणची राजधानी भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केले आहे.

शिबिरातील गणेशभक्तांचा शास्त्रीय पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार

हिंजसच्या वतीने विविध सण-उत्सव धर्मशास्त्रानुसार साजरे करता यावेत, यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. याच पार्श्‍वभूमीवर पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांचे संघटन होण्यासाठी समितीच्या वतीने सार्वजनिक उत्सव समन्वय शिबिर घेण्यात आले.

संभाजीनगर येथे नैराश्येतून सैनिकाची आत्महत्या

येथे सैनिक दैवत साळुंके (वय ३२ वर्षे) यांनी नैराश्येतून आत्महत्या केली. ते मूळचे सातार्‍याचे रहिवासी असून मागील ३ वर्षांपासून संभाजीनगर येथे छावनी परिसरातील दारूगोळा सिद्ध करणार्‍या १६९ युनिटमध्ये कार्यरत होते.


Multi Language |Offline reading | PDF