कोटी कोटी प्रणाम !

• प.प. टेंब्येस्वामी यांची आज जयंती
• सांगली येथील सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांचा आज वाढदिवस

काश्मीरप्रश्‍नाला अफगाणिस्तानशी जोडणे, हे पाकचे दुःसाहस ! – अफगाणिस्तानने पाकला फटकारले

जगभरातून काश्मीरच्या सूत्रावरून लाथाडले जात असतांनाही पाकचे शेपूट वाकडेच रहाणार असल्याने ते आता कापणेच योग्य !

भारताशी युद्ध करण्यासाठी पाककडे शक्तीच नाही ! – पाकच्या संरक्षणतज्ञ आयशा सिद्दीका

युद्धखोर पाकला घरचा अहेर ! पाकमधील जनतेला ठाऊक आहे की, पाकच्या सरकारांनी त्यांना आतापर्यंत मूर्खच बनवले आहे. भारतासमवेत चांगले संबंध ठेवले असते, तर त्याचा लाभ झाला असता; मात्र पाकच्या नेत्यांनी भारताला विरोध करून स्वतःची खुर्चीच सांभाळण्याचा प्रयत्न केला.

(म्हणे) ‘भाजप आणि संघ यांची विचारसरणी ‘नाझीं’शी मिळतीजुळती !’ – पाकचे पंतप्रधान

चोराच्या उलट्या बोंबा ! भाजप आणि संघ यांची नव्हे, तर गेल्या ७२ वर्षांत पाकचीच विचारसरणी नाझींप्रमाणे असल्याने तेथील अल्पसंख्य हिंदूंचा वंशसंहार झाला आहे आणि आता बलुची लोकांचाही तो चालू आहे !

तोंडी तलाक देणार्‍या पतीच्या विरोधात तक्रार करणार्‍या महिलेला सासरच्या लोकांनी जिवंत जाळले

उत्तरप्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्यातील गद्रा गावात २२ वर्षीय सईदा हिला तिचा पती नफीस (वय २६ वर्षे) याने दूरभाषवरून तोंडी तलाक दिला होता.

बार चालू ठेवण्यास प्रोत्साहन दिल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि हवालदार निलंबित

अवैधरित्या बार चालू ठेवण्यास प्रोत्साहन दिल्यामुळे पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज शर्मा यांनी अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालासाहेब शेट्ये आणि एक हवालदार यांना निलंबित केले आहे.

वैज्ञानिक भोंदूगिरी करणार्‍या अंनिसचे २० ऑगस्टला ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस’ पाळण्याचे हास्यास्पद आवाहन !

असे आवाहन करणे, म्हणजे अनुत्तीर्ण विद्यार्थ्याने ‘अभ्यास चांगल्या रितीने कसा करावा ?’, असे सांगण्यासारखे आहे !

श्रीलंकेमध्ये मुसलमानांवर अघोषित आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार

साखळी बॉम्बस्फोटांचा परिणाम ! भारतात गेल्या ३ दशकांत अनेक जिहादी आतंकवादी आक्रमणे झाली; मात्र सहिष्णु हिंदूंनी कधीही असे केले नाही, तरीही हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हटले जाते !

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी मुंबई, पालघर, वर्धा आणि जळगाव येथे जनजागृती !

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळा-महाविद्यालये, वसाहती, मंडळे अशा विविध ठिकाणी व्याख्यानांच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बालिका आदर्श विद्यालय येथे विद्यार्थिनींचे प्रबोधन !

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट दिवशी टिळकवाडी येथील बालिका आदर्श विद्यालय येथे हिंदु जनजागृती समितीचे आधुनिक वैद्य अंजेश कणगलेकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. या वेळी इयत्ता १ ली ते १० वीतील ९०० विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


Multi Language |Offline reading | PDF