आता केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच पाकशी चर्चा होईल ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पाकव्याप्त काश्मीरवरही पाकशी चर्चा कशाला ? पाकव्याप्त काश्मीरही भारताचाच भाग आहे, हे जगजाहीर आहे आणि तो भाग परत घेण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे आता थेट सैनिकी कारवाई करून हा भाग कह्यात घेणे, हेच भारताने केले पाहिजे !

(म्हणे) ‘फॅसिस्ट हिंदु’ असणार्‍या भारत सरकारच्या हातात अण्वस्त्रे सुरक्षित नसल्याची जगाने नोंद घ्यावी ! – इम्रान खान

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकमधील अण्वस्त्रेच सुरक्षित नाहीत आणि ती कधीही जिहादी आतंकवाद्यांच्या हातात जातील, अशी तेथील स्थिती आहे. जगाला याचीच भीती आहे, हे इम्रान खान यांनाही ठाऊक आहे !

‘संस्कृतभारती’ हा जगातील पहिला संस्कृत भाषेतील ‘इंटरनेटवरील रेडिओ’ चालू

१५ ऑगस्ट या जागतिक संस्कृतदिनाच्या दिवशी जगातील पहिला संस्कृत भाषेतील इंटरनेटवरील रेडिओ ‘संस्कृतभारती’ चालू करण्यात आला आहे.

लंडन येथे पाकिस्तान समर्थकांकडून होणारा भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान पत्रकार पूनम जोशी यांनी रोखला

अशा राष्ट्रभक्तांकडून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे काही शिकतील का ?

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्राभिमान जागृत करणारे उपक्रम

१५ ऑगस्टच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे राष्ट्रध्वज विकले जाऊन ते पायदळी तुडवले जातात. हा आणि राष्ट्रध्वजाचा विविध माध्यमांतून होणारा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ ही मोहीम देशभर राबवण्यात येते.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने मान्यवर अन् हिदुत्वनिष्ठ यांना रक्षाबंधन

रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा अन् भावाने बहिणीचे संरक्षण करावे, ही भूमिका असते. याच शुभदिनाचे औचित्य लक्षात घेऊन हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांमध्ये अशी बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी

‘सनातन संस्था कोल्हापूर’ यांच्या वतीने पूरग्रस्तांची तपासणी

‘सनातन संस्था कोल्हापूर’ यांच्या वतीने हालोंडी येथील ७० पूरग्रस्तांची तपासणी करण्यात आली. ही तपासणी आधुनिक वैद्य शशिकांत भूपाल शेंडे यांनी केली, तर त्यांना प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब असिस्टंट) सौ. ज्योती शेंडे यांनी सहकार्य केले.

चोरीला गेलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या २ प्राचीन मूर्ती इंग्लंडकडून भारताला परत

अशा प्राचीन मूर्तींची चोरी होऊन त्या भारताबाहेर जातातच कशा ? भारताचा अमूल्य ठेवा असणार्‍या अशा प्राचीन मूर्तींची देखरेख करू न शकणारे पुरातत्व खाते विसर्जित करा ! अशा मूर्तींचे संवर्धन करण्यासाठी भारत सरकारने पावले उचलावीत, अशीच भारतियांची अपेक्षा आहे !

जम्मूच्या सर्व जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा पुन्हा बंद

१७ ऑगस्टपासून चालू करण्यात आलेली जम्मूच्या सर्व जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा २४ घंट्यांच्या आत पुन्हा बंद करण्यात आली. कलम ३७० रहित केल्यानंतर ती बंद करण्यात आली होती.

विविध संप्रदाय आणि योगमार्ग यांनुसार साधना करणार्‍यांनी एकत्र येणे आवश्यक ! – राजाराम रेपाळ, सनातन संस्था

आज काळानुसार लोकांचे संघटन करणे अनिवार्य झाले आहे. अशा परिस्थितीत प्रथम विविध संप्रदाय आणि योगमार्ग यांनुसार साधना करणार्‍यांनी एकत्र येणे आवश्यक आहे.


Multi Language |Offline reading | PDF