रस्त्यावर नमाजपठण केल्याने रस्ता मुसलमानांच्या मालकीचा होत नाही ! – ‘रामलला विराजमान’चे अधिवक्ता वैद्यनाथन्

मुसलमान रस्त्यावर नमाजपठण करत असतील; म्हणून काही त्यांना त्या जागेवर मालकी हक्काचा दावा करण्याचा अधिकार मिळत नाही. अयोध्येतील जागेवर मुसलमानांनी नमाजपठण केले असेल; मात्र यामुळे त्या जागेवर त्यांचा अधिकार असल्याचा हक्क त्यांना मिळत नाही.

भारत प्रथम अण्वस्त्र वापरणार नसला, तरी परिस्थितीनुसार या तत्त्वात पालट शक्य ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

पोखरण (येथे भारताने प्रथम अणूचाचणी केली होती.) हे असे ठिकाण आहे, ज्यामुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाला ‘आण्विक शक्ती’ म्हणून ओळख मिळवून दिली. तसेच या वेळी त्यांनी ‘नो फर्स्ट युज’ (प्रथम वापरणार नाही) हे तत्त्वही निश्‍चित केले.

३७० कलम हटवल्यामुळे पाकव्याप्त काश्मीरमधील आतंकवाद्यांकडून जिहादची धमकी

हिजबुल मुजाहिदीनचा आतंकवादी खालिद सैफुल्ला, नायब अमिर यांच्यासह अन्य आतंकवाद्यांनी १५ ऑगस्टला पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये प्रेस क्लबसमोर भारताच्या विरोधात आंदोलन केले.

भारतीय न्यायपालिकेत अनुचित कृत्यांमध्ये वाढ ! – सरन्यायाधीश रंजन गोगोई

गेल्या काही काळापासून अनुचित कृत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे भारतीय न्यायपालिका पहाते आहे. अशा घटनांनी सर्वोच्च न्यायालयासह सर्व न्यायालयांमध्ये त्यांचे कुरूप डोके वर काढले आहे.

अमेरिकेकडून पाकच्या आर्थिक साहाय्य निधीमध्ये कपात

अमेरिकेने पाकला देण्यात येणार्‍या आर्थिक साहाय्य निधीमध्ये कपात केली आहे. ‘केरी लूगर बर्मन अ‍ॅक्ट’च्या अंतर्गत देण्यात येणार्‍या या निधीमध्ये ३ सहस्र १२७ कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे.

सरकारचे समान नागरी कायद्याच्या दिशेने पाऊल ! – संजय राऊत

नरेंद्र मोदी सरकारने तोंडी तलाक आणि कलम ३७० रहित  करण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारचे हे निर्णय म्हणजे समान नागरी कायद्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.

तिरुमला येथील श्री बालाजी मंदिराच्या प्रसादरूपी लाडूमध्ये सापडली टाचणी !

तिरुमला येथील श्री बालाजी मंदिरात एका भक्ताने विकत घेतलेल्या प्रसादरूपी लाडूमध्ये टाचणी सापडल्याचे वृत्त आहे. रायचोटीजवळील देवगुडीपल्ली येथील भक्त श्री. शशांक रेड्डी यांनी त्यांच्या बंधूसह नुकतेच भगवान श्री बालाजीचे दर्शन घेतले होते.

पुणे पोलिसांचा उफराटा (अ)न्याय !

हिंदूंवर होणार्‍या या अन्यायाविषयी तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी काही बोलणार नाहीत; कारण त्यांच्या दृष्टीने हिंदुद्वेषी लिखाण करून हिंदुविरोधी प्रचार करणे हीच धर्मनिरपेक्षता आहे !

चिखली (जिल्हा कोल्हापूर) येथील पूरग्रस्तांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे वाटप

पुराने प्रभावित झालेल्या गावात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाण्याच्या बाटल्या, चादरी आदी जीवनावश्यक वस्तू ग्रामपंचायत कार्यालयात सुपुर्द करण्यात आल्या. या वेळी गरजूंना मेणबत्त्यांचे वाटप करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF