महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत महापुरामुळे उद्भवलेली भीषण स्थिती !

लोकहो, भीषण आपत्काळापासून रक्षण होण्यासाठी साधनेविना पर्याय नाही, हे जाणा आणि साधना वाढवून ईश्‍वराची कृपा संपादन करा !

भीषण आपत्काळ आणि रक्षण विशेषांक

विशेषांकास कारण की, . . . हा अंक वाचून प्रत्येकाने येणार्‍या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सिद्धता करावी, अशी जगन्नियंत्या भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !

सैन्यदलांच्या समन्वयासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नेमणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल किल्ल्यावरून घोषणा

तिन्ही संरक्षण दले देशाचा अभिमान आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने तिन्ही दलांमध्ये समन्वयाची आवश्यकता आहे. या तिन्ही दलांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी सरकार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नेमणार आहे. हा अधिकारी पंतप्रधान आणि सैन्यदले यांमध्ये दुवा साधण्याचे काम करील. तसेच तो सरकारचा सल्लागार असेल.

चंद्रयान-२चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास चालू

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) सोडलेल्या चंद्रयान-२ने प्रवासाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. या यानाने पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून थेट चंद्राच्या दिशेने सरळ प्रवास चालू केला आहे.

काश्मीरमध्ये लवकरच काश्मिरी हिंदूंचे सुरक्षित पुनर्वसन करणार ! – जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक

काश्मिरी हिंदूंविना काश्मीर अपूर्ण आहे. सरकार काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी कटीबद्ध आहे. लवकरच त्यांचे राज्यात सुरक्षित पुनर्वसन करू, असे आश्‍वासन जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी येथे आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात बोलतांना दिले.

संयुक्त राष्ट्रांमध्ये काश्मीरवर चर्चा करण्याच्या पाकच्या मागणीला चीनचे समर्थन

मांजराला उंदीर साक्ष या म्हणीनुसार पाकला चीन साहाय्य करणारच ! हे लक्षात घेऊन पाकला धडा शिकवण्यासह चीनलाही धडा शिकवणे आवश्यक !

(म्हणे) भारत काश्मीरमध्ये नरसंहार करण्याच्या सिद्धतेत ! – इम्रान खान यांचा कांगावा

काश्मीरमध्ये हिंदूंवर इतके अत्याचार होऊन एकही हिंदू कट्टरतावादी झाला नाही आणि त्याने कुठेही हिंसाचार केला नाही; मात्र आता काश्मीरमध्ये काहीही झालेले नसतांना मुसलमानांमध्ये कट्टरता वाढून ते हिंसाचार करणार, असे इम्रान खान यांना वाटते. हा त्यांचा कांगावाच आहे !

पाकिस्तानात भारतीय विज्ञापनांवर बंदी

अन्य काही करता येत नसल्याने अशी बंदी घालून पाक त्याचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत आहे ! एकीकडे पाक भारतीय चित्रपट आणि भारतीय कलाकार यांच्यावर बंदी घालतो, तर भारतात पाकच्या अभिनेत्यांना पायघड्या घातल्या जातात आणि त्यांना विरोध करणार्‍यांना तालिबानी म्हटले जाते !

(म्हणे) मलेशियातील हिंदू हे मलेशियाच्या पंतप्रधानांपेक्षा नरेंद्र मोदी यांच्याशी अधिक प्रामाणिक आहेत ! – जिहादी आतंकवाद्यांचे मार्गदर्शक डॉ. झाकीर नाईक यांची गरळओक

मलेशियामध्ये रहाणारे हिंदू हे मलेशियाचे पंतप्रधान महातिर महंमद यांच्यापेक्षा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अधिक प्रामाणिक आहेत, असे विधान जिहादी आतंकवाद्यांचे मार्गदर्शक आणि भारतातून पसार असणारे तथाकथित इस्लामी विचारवंत डॉ. झाकीर नाईक यांनी केले. 


Multi Language |Offline reading | PDF