आम्हालाही भारतामध्ये घ्या !

भारताने कलम ३७० रहित करून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे २ केंद्रशासित प्रदेश निर्माण केल्यावर आता पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट आणि बाल्टिस्तान येथील नागरिकांनी ‘आमचाही भारतामध्ये समावेश करावा’, अशी मागणी केली.

स्वतंत्र लडाख प्रदेशाचे श्रीलंकेकडून स्वागत

जम्मू-काश्मीरसाठीचे कलम ३७० रहित करणे आणि स्वतंत्र लडाख प्रदेशाची निर्मिती करणे, या भारताच्या निर्णयाचे बौद्धबहुल श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी ‘ट्वीट’ करून स्वागत केले.

नंदुरबार येथील हिंदुत्वनिष्ठांचे दमन करणारे उपविभागीय दंडाधिकारी वान्मती सी यांनी दोन्ही हिंदुत्वनिष्ठांना प्रत्येकी १० सहस्र रुपये हानीभरपाई द्यावी !

अशा शासकीय अधिकार्‍यांवर केवळ दंडात्मक कारवाई नको, तर सरकारने त्यांना कायमचे बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, हीच हिंदूंची मागणी !

भारतावर आक्रमण करण्याचा आदेश द्यायचा का ?

इम्रान खान यांची संसदेत विचारणा – पाकने आता आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर जगाच्या नकाशावरून त्याचे अस्तित्वच नष्ट होईल, हे त्याने लक्षात ठेवावे !

कलम ३७० हटवणे आणि लडाख केंद्रशासित करणे याला चीनचा विरोध

भारताच्या अंतर्गत प्रश्‍नांमध्ये वारंवार नाक खुपसणार्‍या विस्तारवादी चीनलाही आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे !

वर्ष १९८२ मधील दरोड्यात आखाड्यातील रामजन्मभूमीचे पुरावे चोरीला ! – निर्मोही आखाडा

रामजन्मभूमीविषयीचे पुरावे असणारी कागदपत्रे वर्ष १९८२ मध्ये आखाड्यावर पडलेल्या दरोड्याच्या वेळी चोरीला गेली, अशी माहिती निर्मोही आखाड्याने ७ ऑगस्टला रामजन्मभूमीविषयी चालू असलेल्या नियमित सुनावणीच्या वेळी दिली.

कोल्हापूर आणि सांगली येथे महाप्रलयाचे थैमान

कोल्हापूर आणि सांगली येथे गेल्या २ दिवसांपासून महाप्रलयाचे थैमान चालूच आहे. सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पुरातून १ लाख ३२ सहस्र ३६० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे ६ ऑगस्टला रात्री येथील ‘एम्स्’ रुग्णालयात उपचाराच्या वेळी निधन झाले.

नागपूर येथे कुख्यात ३ धर्मांध गुंडांची पुन्हा दहशत

कुख्यात गुंड शेख अजहर शेख मजहर याने आमीर आणि त्यांचा एक अल्पवयीन साथीदार यांच्या साहाय्याने ४ ऑगस्टला मध्यरात्रीपासून गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागांत प्रचंड हैदोस घातला. एका दुकानदाराच्या गळ्याला घातक शस्त्र लावून त्याच्याकडून रक्कम लुटली.

स्वत:च्या चुकीमुळे अपघात होणारे रेल्वे प्रवासी हानीभरपाईसाठी पात्र

स्वत:च्या चुकीमुळे अपघात होणार्‍या रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने हानीभरपाई दिली पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी ५ ऑगस्टला दिला आहे. ‘रेल्वे प्रवाशाचा त्याच्या चुकीमुळे अपघात होणे, हा फौजदारी गुन्हा नाही.


Multi Language |Offline reading | PDF