‘पाकव्याप्त काश्मीर’साठी जीवही देऊ ! – गृहमंत्री अमित शहा

मी जेव्हा ‘जम्मू-काश्मीर’ असे म्हणतो, तेव्हा ‘पाकव्याप्त काश्मीर’ आणि ‘अक्साई चीन’ हा त्याचाच भाग आहे, असे अभिप्रेत असते. ‘पाकव्याप्त काश्मीर’ हा जम्मू-काश्मीरचाच भाग असून तो मिळवण्यासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत केले.

आता पाकव्याप्त काश्मीरसुद्धा भारत घेणार ! – पाकचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांचा दावा

यात नवीन काहीच नाही. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे आणि तो भारताने परत घेणे, हा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे पाकने स्वतःहून तो भारताच्या कह्यात द्यावा, अन्यथा परिणामांना सिद्ध रहावे !

‘रॉ’ने केलेल्या अफगाणिस्तानविषयीच्या सूचनेमुळे कलम ३७० रहित करण्याचा निर्णय ?

केंद्र सरकारने कलम ३७० रहित करण्यामागे भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ने (‘रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनलिसिस विंग’ने) अफगाणिस्तानमधील तालिबानी संघटना आणि पाकिस्तान यांच्या संदर्भात दिलेल्या धोक्याची गोपनीय माहिती आहे, असे वृत्त ‘हिंदुस्थान टाइम्स’ या इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.

रामजन्मभूमीवर आमचे १०० वर्षांपासून नियंत्रण ! – निर्मोही आखाडा

राजन्मभूमीवर गेल्या १०० वर्षांपासून आमचे नियंत्रण आहे. ही जागा ‘रामजन्मस्थळ’ म्हणून ओळखली जाते. या भूमीवर वर्ष १९३४ पासून मुसलमानांना येण्यास बंदी आहे, असे निर्मोही आखाड्याचे अधिवक्ता सुशील कुमार जैन यांनी युक्तीवाद करतांना सांगितले.

पाकिस्तान इस्लामी देशांच्या संघटनेच्या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या सूत्रांवर चर्चा करणार

पाकिस्तान जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रहित केल्याचे सूत्र इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या (ओआयसीच्या) होणार्‍या बैठकीत चर्चा करणार आहे.

बकरी ईदसाठी सोसायटीच्या परिसरात कुर्बानीची अनुमती मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली

मुंबई महापालिकेने दिलेल्या ८ सहस्र अनुमत्या रहित कराव्या लागणार – याचा अर्थ ‘महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या अनुमत्या नियमबाह्य होत्या’, असा होतो. अशा अनुमती देणारे प्रशासकीय अधिकारी त्या पदासाठी पात्र आहेत का ? अशांवर कोणी कारवाईची मागणी केल्यास चूक ते काय ?

कोल्हापूर आणि सांगली येथे महापुरामुळे हाहा:कार !

सलग सहा दिवस चालू असलेल्या अतीवृष्टीमुळे इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्ग ४ वर (पुणे-बेंगळूरू महामार्गावर) पाणी आल्याने हा मार्ग ५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला आहे.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या जून २०१९ मधील प्रसारकार्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी आणि आलेल्या अनुभूती

‘१.६.२०१९ या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने सिंगापूर येथे ‘निद्राविकार’ आणि ‘स्वप्ने पडण्यामागचे गूढ कसे जाणून घ्यावे ?’ यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF