जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश

केंद्रातील भाजप सरकारकडून जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन नवीन केंद्रशासित राज्ये निर्माण करण्यात आली आहेत.

(म्हणे) ‘भाजपने राज्यघटनेची हत्या केली !’ – गुलाम नबी आझाद

आतापर्यंत राज्यघटनेची हत्या काँग्रेसनेच केली होती, ती रोखण्याचे काम भाजप सरकारने केले आहे ! ज्यांना राज्यघटनेची हत्या झाली, असे वाटते त्यांनी भारत सोडून निघून जावे !

(म्हणे) ‘दहशतीच्या मार्गाने काश्मीर मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न !’ – मेहबूबा मुफ्ती

दहशतीच्या मार्गानेच काश्मीरवर आतापर्यंत बहुसंख्य असणार्‍या मुसलमानांचा अधिकार होता, तोच आता रहित झाल्याने मेहबूबा मुफ्ती थयथयाट करत आहेत ! याच मार्गाने काश्मीरमधून साडेचार लाख हिंंदूंना पळवून लावण्यात आले, सहस्रो हिंदूंना ठार करण्यात आले, हिंदु महिलांवर बलात्कार करण्यात आले, तेव्हा मेहबूबा मुफ्ती कुठे होत्या ?

आज देश पूर्णपणे स्वतंत्र झाला ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

ज्या बेड्या शिल्लक होत्या, त्या शासनाने आज तोडून टाकल्या आहेत. १५ ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन आहे; मात्र आज आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले.

काश्मीरमध्ये आणखी ८ सहस्र सैनिक नियुक्त

जम्मू-काश्मीरचे विभाजन केल्यानंतर उत्तरप्रदेश, आसाम यांसह देशातील अन्य भागांतून अर्धसैनिक दलाचे ८ सहस्र सैनिक काश्मीरमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत.

पालघर येथे तस्करी होत असलेल्या ३ गायींची सुटका

पालघर जिल्ह्यातील स्थानिक ग्रामस्थांनी चारचाकी गाडीतून होणारी गोतस्करी पकडली. या गाडीमध्ये गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आलेल्या ३ गायींची ग्रामस्थांनी सुटका केली.

धर्मांधाकडून हिंदु असल्याचे भासवून अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार

एका १४ वर्षांच्या हिंदु मुलीला धर्मांध तरुणाने हिंदु असल्याचे भासवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर तिच्यावर बलात्कार करून त्याचा ‘व्हिडिओ’ बनवून तिला ब्लॅकमेल केल्याची घटना समोर आली आहे.

यवतमाळ येथील सनातनच्या साधिका डॉ. भारती हेडाऊ यांना ‘इंडियन पेटेंट’ पुरस्कार जाहीर

डॉ. भारती हेडाऊ यांना भारत सरकारकडून ‘डिझाईन डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड इव्ह्यॅल्युएशन ऑफ ओरोडिस्पर्सिबल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम ऑफ टेस्ट मास्कड फॅमोटिडिन बाय न्युअर रेंज ऑफ आयन एक्सचेंज रेझीन’ संशोधनाकरिता ‘इंडियन पेटेंट’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विमान प्रवासाचे भाडे ५ पट वाढवले 

सुरक्षेच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा थांबवण्यात आल्यानंतर यात्रेकरू आणि पर्यटक यांना काश्मीर तात्काळ सोडून जाण्याची सूचना करण्यात आली आहे

ब्राह्मण समाजाला आरक्षण नको, तर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्या 

ब्राह्मण समाजाला आरक्षण नको, तर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी माढा येथे झालेल्या ब्राह्मण अधिवेशनात करण्यात आली. येथे २ ऑगस्ट या दिवशी ब्राह्मण समाज सेवा संघाने तालुक्यातील ब्राह्मण समाजाच्या मेळाव्याचे आयोजन केले होते.


Multi Language |Offline reading | PDF