कोटी कोटी प्रणाम !

• प.पू. नानामहाराज तराणेकर जयंती, इंदूर
• प.पू. श्यामसाई निर्वाणोत्सव, मध्यप्रदेश
• सनातनचे ४६ वे संत पू. भगवंतकुमार मेनराय यांचा आज वाढदिवस

काश्मीरमध्ये घुसखोरी करणारे पाकचे ७ सैनिक भारतीय सैनिकांकडून ठार

काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रणरेषेवरील चौकीवर आक्रमण करत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘पाकिस्तान बॉर्डर अ‍ॅक्शन टीम’ (बॅट)चा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला.

राजधानी देहलीमध्ये प्रतिदिन ६ महिलांवर बलात्कार होतात !

राजधानी देहलीतच अशी स्थिती असेल, तर संपूर्ण देशाची स्थिती काय असेल ? समाजाची नैतिकता रसातळाला गेल्यानेच अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी शासनकर्त्यांनी जनतेला साधना आणि धर्माचरण शिकवण्याला पर्याय नाही !

ब्राह्मण समाजाची निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची चेतावणी

ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मान्य न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, अशी चेतावणी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने देण्यात आली.

धर्मांधांकडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे २ मास लैंगिक शोषण

अशा घटनांमध्ये अल्पसंख्याक असलेले आरोपी बहुसंख्येने असतात; मात्र याविषयी पुरो(अधो)गामी कधी बोलत नाहीत ? महिला आयोग किंवा महिला संघटनाही त्या विरोधात आवाज उठवत नाहीत; कारण हे सर्व स्वतःला धर्मनिरपेक्ष समजून ‘बलात्कार्‍यांना धर्म नसतो’, असे मानतात !

सौदी अरेबियामध्ये लहान मुलीचे अपहरण करून बलात्कार करणार्‍या दोघांचा शिरच्छेद

सौदी अरेबियामध्ये अशी शिक्षा दिली जाते, तर भारतात का नाही ? असा कोणी प्रश्‍न उपस्थित केला, तर त्यात चुकीचे काय ?

मेरठमध्ये बकरी ईदच्या दिवशी उंटाची कुर्बानी देणार्‍यांना अटक होणार

जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय साहनी यांनी बकरी ईदच्या दिवशी उंटाची कुर्बानी देण्याची अनुमती देण्यास नकार दिला, तसेच सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले की, कुठेही उंटाची कुर्बानी देण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांना अटक करून कारागृहात टाकण्यास सांगितले.

लवकरच हिंदु राष्ट्र येणार ! – श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीदंडी स्वामी

शक्तिपात संप्रदायाचे श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीनृसिंह आश्रय यति (श्रीदंडी स्वामी) यांची सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी भुसावळ येथे नुकतीच भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

अमेरिका आणि युरोप येथे तणाव दूर करण्यासाठी गायीसमवेत वेळ घालवण्याचा उपाय होत आहे लोकप्रिय

जागतिक स्तरावर लोकांमध्ये तणाव वाढत आहे. विविध कारणांमुळे निर्माण होणार्‍या तणावामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी अमेरिका आणि युरोप येथील देशांमध्ये गोमातेसमवेत वेळ घालवण्याचा उपाय करून हा तणाव दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF