६ ऑगस्टपासून रामजन्मभूमीच्या प्रश्‍नावर नियमित सुनावणी

मध्यस्थ समिती अपयशीच ठरणार होती, हे आधीच स्पष्ट होते; मात्र केवळ वेळ काढण्यासाठी ती नेमण्यात आली होती, असाच आरोप प्रत्येक जण करत होता. तेच आता स्पष्ट झाले आहे, असे कोणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

आतंकवादी आक्रमणाच्या धोक्यामुळे अमरनाथ यात्रेकरूंना परतण्याचे आवाहन

अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याच्या शक्यतेमुळे यात्रेकरूंना शक्य तितक्या लवकर निघून जावे, असे आवाहन जम्मू-काश्मीरच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पाकला नष्ट केल्याविना असे धोके टळणार नाहीत, हे जाणा !

झोमॅटो आस्थापनाच्या अन्नपदार्थाची मागणी रहित करणार्‍या हिंदु व्यक्तीला पोलिसांकडून नोटीस !

मुसलमान कर्मचार्‍याकडून अन्नपदार्थाचा पुरवठा नाकारल्याचे प्रकरण : काँग्रेसच्या राज्यातील मोगलाई ! व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न करणार्‍या काँग्रेस सरकारच्या विरोधात एकही पुरो(अधो)गामी आता तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !

देशातील वाढत्या आसुरी घटनांच्या पार्श्‍वभूमीवर जय श्रीराम म्हणण्याची आवश्यकता ! – केरळचे निलंबित पोलीस महासंचालक जेकब थॉमस

देशामध्ये आसुरी घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा वेळी जय श्रीरामच्या घोषणाच देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केरळचे निलंबित पोलीस महासंचालक जेकब थॉमस यांनी केले.

बकरी ईदनिमित्त होणारी गोवंशांची हत्या रोखा ! – धर्माभिमानी हिंदूंची मागणी

यंदा १२ ऑगस्टला असलेल्या बकरी ईदच्या दिवशी कसायांकडून गोहत्या होण्याची शक्यता असल्याने गोहत्या रोखण्यात याव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमानी हिंदूंसह १ ऑगस्ट या दिवशी वाराणसीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली.

जुगारात पत्नीला पणाला लावून हरल्यावर मित्रांकडून पत्नीवर सामूहिक बलात्कार

एका जुगार्‍याने स्वतःच्या पत्नीलाही पणाला लावले आणि तो जुगार हरल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी या पीडित महिलेने पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला.

भारतीय अर्थव्यवस्थेची ५ व्या स्थानावरून ७ व्या स्थानावर घसरण !

भारतीय अर्थव्यवस्था ५व्या स्थानावरून घसरून ७ व्या स्थानावर पोचली आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था ५व्या क्रमांकावर पोचली आहे, तर फ्रान्सची ६ व्या क्रमांकावर आली आहे.

सॅन डिएगो, अमेरिका येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची बालसाधिका कु. वैदेही जेरे (वय ११ वर्षे) हिला तेजतत्त्वाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

एकदा मी रात्री झोपायच्या वेळी अंथरुणावर आडवी पडून श्रीकृष्णाशी बोलत होते. मी श्रीकृष्णाला माझे स्वभावदोष आणि चुका सांगत होते. तेव्हा श्रीकृष्ण मला म्हणाला, यासाठी तू स्वयंसूचना घेतल्या पाहिजेस.

गौहत्ती (आसाम) येथील प्रसिद्ध कामाख्या मंदिराचे पुजारी (दलोय) श्री. कबिंद्रप्रसाद शर्मा यांची भेट

हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभु गवारे यांनी येथील प्रसिद्ध कामाख्या मंदिराचे पुजारी (दलोय) श्री. कबिंद्रप्रसाद शर्मा यांची नुकतीच भेट घेतली.


Multi Language |Offline reading | PDF