पलवल (हरियाणा) येथे गोतस्करांच्या गोळीबारात एक गोरक्षक ठार

एरव्ही गोतस्करी रोखतांना गोरक्षकांकडून होणार्‍या कथित मारहाणीवरून देशात असहिष्णुता वाढल्याची ओरड करणारे या घटनेविषयी का बोलत नाहीत ? आणि प्रसारमाध्यमे अशा घटनांना प्रसिद्ध का देत नाहीत ?

‘जय श्रीराम’ न म्हटल्याने मुसलमान मुलाला जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप खोटा असल्याचे पोलीस चौकशीत उघड

द्वेष पसरवण्यासाठीच अन्सारीने बनाव रचल्याचे उघड ! ‘जय श्रीराम’च्या नावाखाली हिंदूंना अपकीर्त करण्याचाच प्रयत्न देशभरात धर्मांधांकडून केला जात आहे आणि त्या आरोपांच्या आधारे देशात असहिष्णुता वाढल्याचा दावा तथाकथित पुरो(अधो)गामी करत आहेत ! या सर्वांवरच सरकारने कारवाई केली पाहिजे !

८ वर्षांच्या मुलीशी लैंगिक चाळे करणार्‍या इमामाला अटक

येथील मशिदीमध्ये शिकण्यास येणार्‍या ८ वर्षांच्या मुलीशी लैंगिक चाळे करणार्‍या इमाम मुनीर अहमद याला पोलिसांनी अटक केली. अशा घटनांतील आरोपींना शरीयतनुसार शिक्षा करण्याची मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

(म्हणे) ‘दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या हत्या सनातनच्या साधकांनी डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाने योजनाबद्धरित्या केल्या !’

अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची बेताल विधाने ! सनातन संस्थेचे डॉ. जयंत आठवले हे मानसोपचारतज्ञ आहेत. त्यांनी अशा प्रकारची कार्यपद्धत निर्माण केली आहे की, धार्मिक-उपासना यांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या लोकांना निवडून त्यांचा बुद्धीभेद करायचा आणि तालिबानी अतिरेक्यांप्रमाणे त्यांचा मानवी बॉम्ब म्हणून उपयोग करायचा.

नक्षलवाद्यांशी संबंध असणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर कारवाई करा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

गेली ६ वर्षे तपास करूनही दाभोलकर-पानसरे हत्येसंदर्भात केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि विशेष अन्वेषण पथके तपास करत आहेत; मात्र एकाही यंत्रणेला सनातन संस्थेच्या सहभागाचा काहीही पुरावा मिळालेला नाही.

फारूख अब्दुल्ला यांची ‘ईडी’कडून चौकशी

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) चौकशी करण्यात येत आहे.

गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केल्यामुळे भांडुप पोलीस ठाण्यातील ५ पोलीस निलंबित

गुन्हेगारांना पाठीशी घालणारे पोलीस ! गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणारे पोलीस जनतेला कधी कायद्याचे राज्य देऊ शकतील का ? पोलिसांविषयी चांगले अनुभव असल्यास ते ही दैनिक सनातन प्रभातच्या जवळच्या कार्यालयाला कळवा.

हिंदु कर्मचार्‍याद्वारे अन्नपदार्थ पाठवण्याची हिंदु ग्राहकाची मागणी ‘झोमॅटो’ने फेटाळली

मुसलमान व्यक्तीने हलाल नसणारे जेवण मिळाल्याची तक्रार केल्यावर त्याची नोंद घेणारे झोमॅटो आस्थापन हिंदूंना मात्र धर्मनिरपेक्षता शिकवते ! अशा आस्थापनांकडून अन्नपदार्थांची मागणी करण्याचे धर्माभिमानी हिंदूंनी बंद केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांच्या अंगरक्षकांकडून कावड यात्रेकरूंंना मारहाण

लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांच्या खासगी अंगरक्षकांनी काही कावड यात्रेकरूंना मारहाण केली. तेजप्रताप यादव येथील मार्गावरून वाहनातून चुकीच्या बाजूने जात असतांना त्यांना कावड यात्रेकरूंनी विरोध केला.


Multi Language |Offline reading | PDF