जमावाकडून होणार्‍या मारहाणीपासून रक्षण होण्यासाठी शस्त्र बाळगा !

जमावाकडून होणारी हत्या ही मुसलमानांच्या ‘एन्काऊंटर’चे (चकमकीत ठार करणे) नवे रूप आहे. यामुळे मुसलमानांनी जमावाकडून होणार्‍या मारहाणीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी शस्त्र बाळगले पाहिजे, असे चिथावणीखोर आवाहन शिया धर्मगुरु कल्बे जवाद यांनी येथे केले.

बांगलादेश सरकार हिंदु महिलेविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवणार !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांना बांगलादेशातील हिंंदूंवरील अत्याचारांची माहिती देणार्‍या बांगलादेशातील ‘बांगलादेश हिंदू, बौद्ध, ख्रिस्ती एकता परिषदे’च्या संघटनमंत्री प्रिया साहा यांच्यावर आता देशद्रोहाचा खटला चालवण्यात येणार आहे.

अलवर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदु तरुणाची हत्या

हकीमन नावाच्या मुसलमान महिलेला दुचाकी वाहनाची धडक बसल्यानंतर धर्मांधांच्या जमावाने केलेल्या मारहाणीत हरिश नावाचा हिंदु दुचाकी चालक ठार झाला. ही घटना १६ जुलै या दिवशी फसला गावामध्ये घडली.

(म्हणे) ‘लठ्ठ मुली स्वर्गात जात नाहीत !’

सिद्ध ख्रिस्ती पाद्री मार्सेलो रॉसी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात ५० सहस्र लोकांसमोर ‘लठ्ठ मुली स्वर्गात जात नाहीत’, असे विधान केले. हिंदु धर्मात महिलांना हीन लेखले जात असल्याचा खोटा आरोप करणारे पुरो(अधो)गामी, प्रसारमाध्यमे आणि तथाकथित स्त्रीमुक्तीवादी संघटना महिलांच्या या अवमानाविषयी आता गप्प का ?

भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

येथे २० जुलैच्या रात्री चारचाकी आणि दुचाकी यांवरून आलेल्या अज्ञात मारेकर्‍यांनी भाजपचे नेते डॉ. बी.एस्. तोमर यांची गोळ्या झाडून हत्या केली.

खेड (जिल्हा रत्नागिरी) येथील शिवकालीन रसाळगडाच्या कोठाराची भिंत ढासळली !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तालुक्यातील रसाळगड किल्ल्यावरील कोठाराची भिंत ढासळली आहे. या गडासाठी गेल्या १० वर्षांत डागडुजीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आले आहेत; मात्र गडाची दुरवस्थाच झाली आहे.

अमेरिकेत हिंदु पुजार्‍याला मारहाण

येथील शिवशक्ती पिठाचे ५२ वर्षीय पुजारी हरिश चंदेर यांना अज्ञात व्यक्तीने पाठलाग करून अमानुष मारहाण केल्याची घटना १८ जुलै या दिवशी येथील ‘फ्लोरल पार्क’ येथे घडली.

बलात्कारप्रकरणी कह्यात घेतलेला संशयित आरोपी पसार

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी कह्यात घेतलेला संशयित आरोपी अशोक पारवे हा जिल्हा शासकीय रुग्णालयातून पसार झाला.

हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करणे, हीच काळानुसार खरी गुरुदक्षिणा आहे ! – ब्रह्मर्षि पुराण वाचस्पती महेश्‍वर शर्मा

हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण करणे, हे प्रत्येक हिंदूच्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे आणि हीच काळानुसार खरी गुरुदक्षिणा आहे, असे प्रतिपादन ब्रह्मर्षि पुराण वाचस्पती महेश्‍वर शर्मा यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF